रविवार दि.३० नोव्हेंबर रोजी आसू येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा*
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
हुतात्मा राष्ट्रबंधू राजीव दिक्षित यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी दिला जाणारा स्वदेशी भारत राज्यस्तरीय साहित्य सन्मान पुरस्कार पुसेगाव ता.खटाव येथील लेखक दिनेश फडतरे यांच्या रँडम या लेखसंग्रहाला जाहीर झालाय .
रँडमला मिळालेला हा चौथा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.या अगोदर या पुस्तकाला कराडचा स्पंदन पुरस्कार, कांगोणी ता.नेवासा येथील श्री संत सुडके महाराज जीवन गौरव पुरस्कार, श्रीरामपूरचा ज्ञानज्योती पुरस्कार प्राप्त आहेत..रविवार दि.३०/११/२०२५ रोजी आसू ता.फलटण जि.सातारा येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे..पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह असं पुरस्काराचे स्वरूप आहे ...
स्वदेशी भारत २०२५ पुरस्कार मिळाल्याबद्दल दिनेश फडतरे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती प.पु.सुंदरगिरी महाराज, पुसेगाव देवस्थानचे चेअरमन श्री संतोष वाघ व देवस्थानचे सर्व विश्वस्त, ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी ,पुसेगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष,अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर यांनी फडतरे यांचे अभिनंदन केले.. आणि भावी साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..





Social Plugin