Ticker

6/recent/ticker-posts

सिल्लोडमध्ये शिंदेसेना भाजपातच सामना होणार



सिल्लोड प्रतिनिधी आकाश पा कोके 

प्रत्येक वॉर्डात उमेदवार देण्यासाठी सर्वच पक्षांची तयारी; रणधुमाळी सुरूसिल्लोड नगरपरिषद निवडणुकीची घोषणा मंगळवारी निवडणूक आयोगाने केल्यानंतर सिल्लोड शहरात राजकीय हालचाली वाढल्या असून सर्वच प्रमुख पक्षांनी प्रत्येक वार्डात उमेदवार देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. संभाव्य उमेदवारांच्या बैठका घेण्याचा सपाटा सुरू झाला असून रात्रीच्या बैठका वाढल्याने अनेक चर्चाना वेग आला आहे. राज्यात काही ही होवो सिल्लोडमध्ये मात्र शिंदेसेना विरुद्ध भाजप असाच सामना बघायला मिळणार आहे.


सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारणसाठी सुटले आहे. शिंदेसेनेकडून आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांचे पुत्र अब्दुल समीर यांचीच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून म्हणून घोषणा केली आहे. इतर कुण्याही पक्षाने अजून उमेदवार घोषित केलेला नाही. फक्त काही स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांनी भावी नगराध्यक्ष म्हणून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या आहेत. शहरात ५४ हजार ८०८ एकूण मतदार आहेत. हे मतदार १४ प्रभागातून २८ नगरसेवक निवडणार आहेत. शिवसेना उद्धव सेना, भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम व इतर छोटे मोठे पक्ष भाजप सोबत एकत्र येऊन निवडणूक लढवण्यासाठी नियोजन करीत असल्याची चर्चा आहे; पण ते सध्या तरी शक्य दिसत नाही. आमदार अब्दुल सत्तार यांनी मात्र गेल्या १० दिवसांपूर्वीच प्रचार सुरू केला आहे.