सिल्लोड प्रतिनिधी आकाश पा कोके
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात तब्बल १३ कोटी ३३ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आमदार सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे तातडीने सुरू करून गुणवत्ता राखत निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
या प्रसंगी भूमिपूजन करण्यात आलेल्या महत्त्वाच्या कामांमध्ये सिल्लोड मुख्य असवारात ९१ नवीन गाळ्यांचे बांधकाम निधी ११ कोटी रुपये, सिल्लोड आवारातील सिमेंट काँक्रीट रस्ते व आरसीसी गटार नाल्या बांधकाम १ कोटी ३१ लाख रुपये, मुंबई व शिवना अंभई व
शिवना उपसमिती आवारात सिमेंट काँक्रीट, सोयगाव बाजार आवारात स्ट्रीट लाईट बसविणे, निधी १ कोटी २ लाखांचा निधी असा १३ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या भूमिपूजनप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, संचालक नंदकिशोर सहारे, जयराम चिंचपुरे, दामूअण्णा गव्हाणे, सतीश ताठे, रमेश लाठी, शेख जावेद यांच्यासह चेअरमन हनिफ मुलतानी, किशोर अग्रवाल, राजेंद्र ठोंबरे, बिलास शिंदे, रमेश कासलीवाल, पांडुरंग जैवळ, मोहसीन देशमुख, सुदर्शन अग्रवाल, ज्ञानेश्वर जाधव, सतीश गौर, विजय पवार, सत्यनारायण गट्टाणी, सुखदेव जाधव आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी व शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बाजार समितीच्या विकासाला गती देणार शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी बाजार समितीच्या विविध बाजारपेठेतील बाजारांचा सर्वांगीण विकास आवश्यक आहे. सिल्लोड परिसरातील मार्केट कमिटी जिल्ह्यातच नव्हे तर सबंध मराठवाड्यात अस्वस्थानी व आदर्श ठरेल यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले. सिल्लोड बाजार समितीच्या अखत्यारीतील सिल्लोड, शिवना, अंभई तसेच सोयगाव उप बाजारांच्या विकासाला गती मिळून शेतकन्यांना अधिक सुविधा उपलब्ध होईल,





Social Plugin