महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ व लोकसंचालित साधन केंद्र पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बान्सी येथे महिला सक्षमीकरण, लिंग समभाव या विषयांवर आधारित पथनाट्य सादरीकरण प्रेरणा नाट्य मंडळ नानंद ई यांच्याकडून करण्यात आले या पथनाट्य मध्ये प्रमुख भूमिका शाहीर गोपाल मारकड यांनी निभावली आहे व सोबत नानंद येथील सरपंच संजय धुळे, काळे सर,ढोलकी सम्राट इंगोले सर, हास्यसम्राट वाघमारे सर, बरडे सर , इंगोले पेटीमास्टर व इतर कलाकार होते या कार्यक्रमासाठी बान्सी येथील सरपंच गजानन नामदेव टाले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री रमेश आगलावे, जेष्ठ नागरिक श्री नत्थु मानतुटे, देविदास देशमुख, कृष्णा दांडेकर, सौ मोहिनी देशमुख , सौ कोकीळाबाई डाखोरे, मालुबाई कळंबे यांच्या सह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ रुपालीताई कृष्णा दांडेकर (सहयोगिनी), सुवर्णाताई धुळे (सहयोगिनी)यांनी मेहनत घेतली





Social Plugin