Ticker

6/recent/ticker-posts

अंबड शहराच्या मागासलेपणा,दुरावलेला विकासासाठी नैतिक जबाबदारी समजून कर्तव्य बजावणार:सौ.श्रद्धा शिवप्रसाद चांगले



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

मराठवाड्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात धार्मिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,कला,साहित्य क्षेत्रात अंबड शहर तालुक्याचे मुख्य ठिकाण असणारे शहर आहे.मा.आमदार राजेश टोपे हे या मतदारसंघाचे आमदार असताना मराठवाड्यात झाला नाही तो विकास अंबड शहराचा झाला.

पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृह,पॉलिटेक्निक कॉलेज,मत्सोदरी देवी मंदिर विकास,१०० रुग्ण खात्याचे अद्यावत रुग्णालय,अंबड शहरातील अंतर्गत रस्ते असे विधायक कामे आजही राजेश टोपे यांच्या विकासाची साक्ष देतात. 

परंतु गेल्या दहा वर्षापासून अंबड शहराची सत्ता भाजपाच्या हाती येताच अंबड शहराचा विकास खुंटला,विद्यमान आमदार व घरच्याच नगराध्यक्षा यांनी अंबड शहराचा विधायक व दिर्घकालीन विकास केलेला नाही.आणि याच अंबड शहराच्या दुरवलेल्या व सर्वसामान्य जनतेला भेडसवणाऱ्या प्रश्नाबाबत राष्ट्रवादीचे गटनेते शिवप्रसाद चांगले यांनी सातत्याने आवाज उठवत आपली नैतिक जबाबदारी पार पाडली आणि खऱ्या अर्थाने अंबड शहराच्या खुंटीत झालेल्या विकासावर दिर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी अंबड शहराच्या नावलौकिकास साजेशे व विकासात्मक कार्य करण्यासाठी त्यांच्या धर्मपत्नी सौ.श्रद्धा शिवप्रसाद चांगले या अंबड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. 

त्यांच्याशी महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधींनी चर्चा केली असता"अंबड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्षा म्हणून अंबड शहरवासीयांनी एक संधी दिल्यास मी माझी नैतिक जबाबदारी समजून माझे आद्य कर्तव्य पार पाडणार!"असल्याची अत्यंत आत्मविश्वास्मक, परिणामकारक भावना व्यक्त केली. 

अंबड शहरातील जनतेला गुत्तेदारी हवी की अंबड शहराचा विकास?असा प्रतिप्रश्न त्यांनी वृत्तपत्रच्या माध्यमातून जनतेला विचारला.आणि यावर अंबड शहरातील जनता,जी विकासापासून कोसो दूर झाली ते कसे प्रतिसाद देतात हे औचित त्याचे ठरणार आहे.