Ticker

6/recent/ticker-posts

अंबड नगर परिषद रणधुमाळी २०२५ प्रभाग क्र.१ मध्ये जनतेचा जनसेवक



*​महायुतीचे उमेदवार गंगाधर भाऊ वराडे यांच्या विजयरथावर धडाकेबाज आगेकूच विरोधकांचे धाबे दणाणले*

​अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

अंबड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा रणसंग्राम आता अक्षरशःतापला आहे आणि संपूर्ण शहरभरात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे प्रभाग क्रमांक १ ची ​भारतीय जनता पार्टी आणि रासप (महायुती) गठबंधनाचे तरुण तडफदार आणि जनतेच्या मनात घर करणारे नेतृत्व श्री.गंगाधर भाऊ वराडे,यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीच्या बळावर प्रभागात एकतर्फी वातावरण निर्माण केले आहे.त्यांच्या विजयरथा ची धडाकेबाज आगेकूच पाहून विरोधकांचे अक्षरशःधाबे दणाणले आहेत.

कामाचा धडाका विकासाचा झंझावात

​नगरसेवक म्हणून काम करताना गंगाधर भाऊ वराडे यांनी दाखवून दिले की विकास हे केवळ भाषणात नव्हे तर कृतीत दिसले पाहिजे.वर्षानुवर्षे रखडलेले पाणी आणि रस्त्यांचे जटील प्रश्न मार्गी लावत त्यांनी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

​सर्वात महत्त्वाचे म्हणजे,वराडे यांनी विकास निधीच्या प्रतीक्षेत न राहता अनेकदा स्वखर्चातून पुढाकार घेतला.रस्ते दुरुस्त करणे मुरूम टाकणे अशी अत्यावश्यक कामे तातडीने करून त्यांनी लोकांच्या विश्वासाचा पाया अधिक भक्कम केला आहे.या सर्व उपक्रमांमुळे नागरिकांच्या हृदयात गंगाधर भाऊ वराडे यांचे स्थान विकासाचा खरा अर्थ दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून अधिक दृढ झाले आहे.

 समाजसेवा लोकांमधील खरा नातेसंबंध

​गंगाधर भाऊ वराडे हे केवळ विकासपुरते नेते नाहीत तर सामाजिक जबाबदारी निभावणारे जनतेचे माणूस आहेत.शासकीय योजनांचा लाभ त्यांनी गरजू वृद्ध आणि महिलांना घरपोच सुविधा उपलब्ध करून दिला.​गरीब आणि वंचितांना हक्काचे अन्नधान्य मिळावे म्हणून त्यांनी राबवलेली राशन कार्ड मोहीम ही नागरिकांचे काळीज जिंकणारी मोहीम ठरली आहे.

​हक्काचा माणूस २४ तास तत्पर

​वराडे यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जनतेसाठी असलेली उपलब्धता ​सुख-दुःखात असो वा रात्री-अपरात्री मदतीसाठी एक हाक दिली की गंगाधर भाऊ वराडे तत्काळ उपस्थित होतात. नागरिकांच्या अडचणींमध्ये सहभागी होऊन त्यांच्या समाधानासाठी वणवण करणारा हा लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने हक्काचा माणूस' ठरतो आहे.

गंगाधर भाऊ वराडे यांचा विश्वास माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिक माझे कुटुंबच आहे. त्यांच्या सुख-दुःखात मी नेहमीच सोबत राहिलो आहे आणि राहणारही.विकासाची ही गंगा कधीच थांबणार नाही.प्रभाग १ चा विकास हाच ध्यास या ब्रिदवाक्याने सज्ज झालेले गंगाधर भाऊ वराडे पुन्हा एकदा प्रभागाचा कायापालट घडविण्याच्या तयारीत आहेत.मतदारांचा त्यांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या विजयरथास अडविणे विरोधकांसाठी अत्यंत कठीण ठरणार आहे असे चित्र सध्या प्रभाग क्र. १ मध्ये दिसत आहे.