Ticker

6/recent/ticker-posts

लोहा व कंधार नगरपरिषद निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य जाहीर सभा .

 


ग्रामीण पत्रकार संतोष चमकुरे लोहा

 लोहा व कंधार नगरपरिषद निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य जाहीर सभा आज लोहा येथे झाली. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, खा.डॉ. अजित गोपछडे, आ.डॉ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. जितेश अंतापूरकर, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, नांदेड भाजपचे महागरचे अध्यक्ष व माजी आमदार अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, नांदेड उत्तरचे अध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, लोहा नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार गजानन सूर्यवंशी, कंधारचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाप्रसाद यन्नावार, लोहा-कंधार विधानसभेचे भाजप प्रभारी एकनाथ पवार, मंडळ अध्यक्ष चंद्रसेन पाटील, विजय धोंडगे, बालाजी पांडागळे आदी उपस्थित होते. यावेळी भाजपच्या जाहीरनाम्याचेही विमोचन करण्यात आले.