प्रतिनिधी :- लक्ष्मण बिल्हारे
परतूर विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत आठ महत्त्वाच्या विकासकामांना राज्य सरकारकडून तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, ही कामे माजी मंत्री व भाजप नेते, परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून मार्गी लागल्याची माहिती मिळाली आहे. पर्यटन व प्रादेशिक विकास विभागाचे मंत्री मा. श्री. शंभूराजे देसाई यांच्याकडे आमदार लोणीकर यांनी पाठवलेल्या प्रस्तावांवर सकारात्मक कारवाई करत विभागाने ही कामे मंजूर केली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था — जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याची अधिकृत माहितीही समोर आली आहे.
या मंजुरीमुळे परतूर-मंठा परिसरातील धार्मिक पर्यटनाला नवसंजीवनी मिळणार असून, भाविक व पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध होतील. रस्ते, सभागृहे व परिसर विकासामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची उन्नती होण्याबरोबरच स्थानिक अर्थकारणालाही चालना मिळणार आहे. आमदार बबनराव लोणीकर यांनी या मंजुरीबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की, “मतदारसंघातील सर्वांगिण विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. राज्य सरकारकडून मिळालेली ही मंजुरी म्हणजे आमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आहे. येत्या काही दिवसांत प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर कामांना गती मिळेल.”
मंजूर झालेल्या पर्यटन विकासकामांची तपशीलवार आकडेवारीप्रदेशातील धार्मिक, सामाजिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांच्या विकासासाठी एकूण ३ कोटी ९० लाख रुपये खर्चाच्या पुढील कामांना मंजुरी देण्यात आली आहे:
📌 पर्यटन अंतर्गत मंजूर होणारी विकासकामे (एकूण – ३९० लक्ष रुपये)
१️⃣ श्रीक्षेत्र ओंकारेश्वर संस्थान, देवगाव खवणे (ता. मंठा)
➡️ सभागृह बांधकाम
💰 १०० लक्ष रुपये
२️⃣ श्रीक्षेत्र पाटोदा (माव), ता. परतूर
➡️ गणपती मंदिर परिसरात सिमेंट रस्ता
💰 १०० लक्ष रुपये
३️⃣ श्रीक्षेत्र पिंपरखेडा, ता. मंठा
➡️ निळकंठेश्वर मंदिर येथे सिमेंट रस्ता
💰 ५० लक्ष रुपये
४️⃣ श्रीक्षेत्र शंभू सावरगाव, जि. जालना
➡️ महादेव मंदिरा समोर सभागृह
💰 ५० लक्ष रुपये
५️⃣ श्रीक्षेत्र कोकरसा, ता. मंठा
➡️ सिमेंट रस्ता
💰 २५ लक्ष रुपये
६️⃣ श्रीक्षेत्र चतुर्वेदेश्वर संस्थान, ता. परतूर
➡️ सिमेंट रस्ता
💰 २० लक्ष रुपये
७️⃣ श्रीक्षेत्र नांगरतास, ता. मंठा
➡️ सिमेंट रस्ता
💰 २० लक्ष रुपये
८️⃣ श्रीक्षेत्र रोहिणा, ता. परतूर
➡️ मांडवा देवी मंदिरा समोर सभागृह
💰 २५ लक्ष रुपये





Social Plugin