Ticker

6/recent/ticker-posts

रेती चोरीत महसूल विभागाचे कोट्यावधीचे नुकसान.

 

वाळूच्या कृत्रिम तुटवड्यामुळे घरकुल बांधकाम रखडले ग्रामीण भागातील घरकुलधारक त्रस्त अनेकांचे बांधकाम थांबले 

 प्रतिनिधी कैलास कुडमते 

 रेती घाट आहेत मात्र या रेती घाटाचा लिलाव न झाल्याने यामुळे महसूल विभागाचे कोट्यावधी रेतीची चोरी होत आहे यामुळे महसूल विभागाचे नुकसान होत आहे मात्र महसूल प्रशासन रेतीचे ट्रॅक्टर पकडून नाम मात्र कारवाई केल्याचा फंडा वापरत असल्याचे बोलल्या जात आहे या परिसरातील सर्वसामान्य बांधकाम करणाऱ्या घरकुल लाभधारक वर्ग सह बांधकाम व्यवसायिकांना याचा फटका बसत आहे ग्रामीण भागात नंबर दोन ची रेती भल्या पहाटे रेती विक्रीस येत आहे मात्र घरकुल लाभार्थ्यांना रेती भेटत नसल्याने घरकुल बांधकाम ठप्प झाले आहे गटविकास अधिकाऱी म्हणाले की बांधकाम का थांबले जे कोणी घरकुल बांधले नसेल तर कारवाई होईल असा इशारा दिला आहे मात्र घरकुल लाभार्थ्यांना रेती भेटत नसेल तर या लोकांनी काय करावे याचा मार्ग संबंधित विभागाने काढावा ग्रामीण भागात वाळूचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून चोरीने रेती विक्री करणाऱ्या कडून आठ हजार रुपये या भावाने रेती घ्यावी लागत आहे तर या भावाने घरकुल लाभधारक रेती घेणार का असा प्रश्न पडला असून यामुळे ग्रामीण भागात अनेकांचे बांधकाम ठप्प झाले असून वाळूचा कृत्रिम टंचाईमुळे घराचे बांधकाम अर्धवट पडून आहे तर काहींचे सुरू आहे याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे या परिसरातील धानोरा(शीख) रामपूर टेंभी  पाथरी पारडी  खंबाळा आदी ठिकाणची रेती घाटाचा लिलाव न झाल्याने सामान्य सोबतच घरकुल लाभधारकांनाही चढ्या दराने खरेदी खरेदी करावा लागत आहे 
काही रेती घाटातून प्रशासनाच्या पथकातील  यंत्रणेकडून चोरटी रेतीला मुख संमती आहे का असा प्रश्न उभा आहे दहली सज्जा चे तलाठी कार्यालय   नेहमी बंद  असल्याने नागरिकांना  त्रास होत आहे    मंडळ अधिकारी तलाठी भेटत नसल्याने नागरिकात नाराजी व्यक्त होत  असल्याचे दिसून येते  या परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक सुरू असूनही याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे   सामान्य लोकांना रेती स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावे अन्यथा ग्रामीण भागातील घरकुल लाभधारकांना घरकुलाचे बांधकाम होणारच नाही असे दिसून येते या संबंधित विभागाचया मंडळ अधिकारी तलाठी मुंग गिळून गप्प आहे का ? उघड्या डोळ्यांनी पाहुनही  कारवाई होत नसल्याने त्यांच्यावर शंका उपस्थित केल्या जात आहे    या परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने ठीक ठिकाणी नदी नाल्यांना मोठी रेती असून त्या ठिकाणचा रेतीचा  नाल्यातून उपसा केल्या जात आहे याकडेही मंडळ अधिकारी व तलाठ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.