अंबड सराफा असोसिएशनची तहसीलदारांना लेखी मागणी*
अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड तालुक्यातील सोने व्यापारी डॉ.माळगावकर यांची झालेली अमानुष हत्या ही संपूर्ण सराफा व व्यापारी समाजासाठी अत्यंत धक्कादायक व संतापजनक घटना असून, या प्रकरणातील आरोपींच्या तात्काळ अटकेसह कठोर शिक्षा व्हावी,तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून विशेष पथक नेमून जलदगती न्यायालयात खटला चालवावा,अशी मागणी अंबड सराफा असोसिएशनने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
घटनेतील क्रौर्य पाहता आरोपींनी समाजात दहशत निर्माण केली असून व्यापारी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.म्हणून शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून दोषींना नमुना शिक्षा देणे गरजेचे असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर पुढील पदाधिकारी व सदस्यांनी सह्या केल्या :अंबड सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल सेठ उदावंत,अमोल शहाणे, गोपाल अडाणी,बाळु शहाणे,सचिन कदम,मयूर बागडे,दिपक मेड, अशोकराव आंबिलवादे,दत्ता अडाणी,भास्करराव बोराडे,कृष्णा अंबिलवादे,बजरंग अडाणी,राहुल अंबिलवादे, उद्धव अडाणी,ज्ञानेश्वर मेड,श्याम अडाणी,कुणाल अडाणी,श्रीकृष्ण अंबिलवादे, बालाजी अंबिलवादे,महेश शहाणे आदींचा समावेश आहे.
निवेदन तहसील कार्यालयात जमा करण्यात आली असून प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही होण्याची व्यापाऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





Social Plugin