Ticker

6/recent/ticker-posts

मनीषा ताई टोपे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

मत्स्योदरी विद्यालय पिंपरखेड बू शाळेला    मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.मनीषा ताई टोपे यांची भेट.दिनांक 17/11/2025 रोजी सौ.मनीषा ताई टोपे यांनी भेट देवून पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व सुरक्षे संदर्भात महत्वाच्या सुचना शिक्षकांना दिल्या.

तसेच लोकसहभागातून चालू असलेल्या दोन रुमच्या बांधकामाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.सहकार्य करणाऱ्या सर्व गावकरी,पालक व माजी विद्यार्थ्यांचे त्यांनी यावेळी आभार मानले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.के.एन.गवळी सर यांनी शाळेतील शालेय व सहशालेय उपक्रमांची सर्व माहिती दिली.

यावेळी पं.स.चे मा.सभापती श्री.भागवतराव रक्ताटे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीपादजी कंडारकर,परमेश्वरजी केदार,अशोकराव भगत,‌डॉ.शंकर तिकांडे,श्री.दादारावजी मुळे व  शाळेतील कर्मचारी व पालक यावेळी उपस्थित होते.