विशाल पाटील@ पन्हाळा प्रतिनिधी
विजेच्या तारेत शॉर्टसर्किट झाल्यामुळे उडालेल्या ठिणग्या गोठ्यातील वैरणीत पडल्याने पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील नंदू रामा शेवाळे यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली. शनिवारी रात्री आठच्या सुमारास लागलेली आग गावातील युवकांनी मोठ्या शर्थीने विझविली. आगीचा भडका उडण्यापूर्वी ग्रामस्थांनी धाडसाने गोठ्यातील आठ जनावरे बाहेर काढल्याने अनर्थ टळला. यावेळी आगीने तापलेला लोखंडी अँगल बाहेर ओढताना विकी भोपळे यांच्या हाताला भाजले. घटना अशी घडली, पोर्ले येथील मराठी शाळेजवळील मुख्य रस्त्याला लागून नंदू शेवाळे यांचा जनावरांचा गोठा आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास जनावरांच्या गोठ्याच्या वर रचलेल्या माळ्यावरील तेथे८ वाजण्याच्या सुमारास रात्री आग लागली.
वाळलेल्या वैरणीत विजेच्या तारेचे शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्या. ठिणग्या वैरणीत शिरल्याने आगीचा भडका उडाला. दरम्यान, गोठ्याच्या शेजारी लग्नसमारंभातील हळदीचा कार्यक्रम सुरू होता. जमलेल्या तरुणांना आग लागल्याचेदिसताच त्यांनी प्रथम गोठ्यातील जनावरांची दावी सोडून त्यांना सुखरूप बाहेर काढले. तसेच हळदीसाठी पाणी भरून आणलेल्या टँकरमधील पाणी आग विझविण्यासाठी वापरल्याने आग आटोक्यात आणण्यात लोकांना यश आले. आगीत लाकडी साहित्य आणि वैरणीचे नकसान झाले. जनावरांच्या गोठ्याला लागलेली आग ग्रामस्थांनी विझविली.





Social Plugin