गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषद,पुणे यांच्याकडून जिवायो सन २०२३-२४ अंतर्गत ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी विशेष अनुदानातून २०२४ मध्ये बिरोबावाडी अंतर्गत रस्ता करण्याकरिता २० लक्ष इतका निधी मिळाला तसेच या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा कालावधी हा मार्च २०२५ मध्ये संपला आहे परंतु अद्यापही त्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही तरी कंत्राटदार (contractor) श्री नागनाथ गुंजाळ यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता हे काम वनविभाग (forest department) यांच्याकडून थांबवण्यात आलेले आहे असे त्यांनी सांगितले.सदर रस्ता हा वन विभागाच्या हद्दीतून गेलेला आहे.
असून तरीही ग्रामपंचायत कडून किंवा कंत्राटदार यांच्याकडून कुठल्याही प्रकारची रस्ता करण्याकरिता लागणारी परवानगी घेण्यात आलेली नसून याला जबाबदार कोण असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे तब्बल नऊ महिन्यांपासून नागरिकांना त्या अर्धवट व खडी टाकलेल्या रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे तसेच गावच्या विकासाबाबत अतिशय गतीमंद असलेल्या ग्रामपंचायत सदस्य हे पाच वर्षात फारसा निधी गावासाठी आणण्यात प्रयत्नशील दिसलेले नाहीत त्यातच आलेले एखादे काम सुद्धा ग्रामपंचायत कडून पूर्ण करून घेता आले नाही ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी केली असता आमचा त्या कामाशी काही संबंध नाही असे ग्रामसेविका सुरेखा सोनवणे यांच्याकडून सांगण्यात आले
.jpg)




Social Plugin