अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
घुंगर्डे हादगाव ते रुई दरम्यानचा पांदण रस्ता मागील काही वर्षांपासून पूर्णपणे बंद पडला असून त्यामुळे शेतकरी व नागरिकांचे हालहाल झाले आहेत.या रस्त्याचा वापर पूर्णपणे ठप्प झाल्याने शेतमाल वाहतूक,जनावरांची हालचाल आणि दैनंदिन गरजा भागविण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून तो पुन्हा सुरू करण्यासाठी आज ग्रामस्थांच्या वतीने मा.तहसीलदार साहेब,अंबड यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे,गेल्या काही वर्षांपासून रस्ता बंद असल्यामुळे लोकांना पर्यायी मार्गाने लांब फेऱ्या माराव्या लागत आहेत.हा पांदण रस्ता सुरु झाल्यास गावांतील दळणवळण सुकर होईल तसेच ग्रामीण भागातील गरजांची पूर्तता सहज होऊ शकेल.ग्रामस्थांनी तहसीलदार साहेबांकडे रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कामास मंजुरी देण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin