महाराष्ट्र ग्रामीण न्युज हदगाव प्रतिनिधी देवानंद महाजन
भारताचे संविधान व त्यातील मौलिक तत्वे, हक्क व कर्तव्ये यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हा उदात्त हेतू समोर ठेवत 26 नोव्हेंबर - संविधान दिनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निवघा (बा.) ता. हदगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम गावातून विदयाथ्यार्थ्यांची प्रभात फेरी घोषणा देत व फ्लेक्सद्वारे जन जागृती करण्यात आली. त्यानंतर शाळेमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री. रेपुरवार सर यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि सुरवात केली व प्रसंगी विदयार्थ्यांनी भाषणातून संविधानाची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. वाघमोर सर, श्री मुपडे सर व श्रीमती महकरकर यांनी अनमोल मार्गदर्शन केले. श्री. चेपूरवार सर यांनी प्रश्नमंजुषा प्रश्नमंजुषा घेतली. दुपारी स्वत: चित्रकला स्पर्धा व प्रश्नमंजुषा घेण्यात आली, ज्यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञान व कौशल्याचा विकास होईल. एकंदरीत संविदान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यासाठी श्री. स्वामीसर, श्री. देशमुख सर, श्री कदम सर, श्रीमती अल्लडवाड, श्रीमती स्वामी मॅडम ,श्रीमती देबडवार, श्रीमती कांबळे, श्रीमती कळसांगवीकर, श्रीमती चव्हाण वू श्रीमती गुंजकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार व नियोजन सांस्कृतिक प्रमुख श्री. सारिका आन्चम यांनी
.jpg)




Social Plugin