पत्रकार: निरंजन बावस्कर , भोकरदन
आज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ शेख चाँद चौक, भोकरदन येथे मा.आ. चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भव्य प्रचार फेरी व जाहीर सभा पार पडली.
या भव्य प्रचार फेरी व जाहीर सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मा.महेबुब भाई शेख, ओ.बी.सी. सेलचे प्रदेशउपाध्यक्ष तथा पक्षनिरिक्षक मा.संजयजी काळबांडे व पक्षनिरिक्षक मा. नंदकुमारजी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आपल्या शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि आधुनिक सुविधा या सर्व क्षेत्रांचा विकास हेच आमचे मुख्य ध्येयवाक्य असुन भोकरदन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जनतेच्या मुलभूत गरजांची प्रभावीपणे पूर्तता करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन सर्व मतदार बंधू-भगिनींना करण्यात आले.
यावेळी युवानेते श्री.सुधाकर दानवे, तालुकाध्यक्ष श्री.रमेशशेठ सपकाळ, युवक तालुकध्यक्ष प्रा.अंकुश जाधव सर, शहराध्यक्ष नईम कादरी, मा.उपनगराध्यक्ष शफिक शेठ पठाण, शब्बीर कुरेशी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार समरीन नाज वसीम बेग मिर्झा, नगरसेवक पदाचे उमेदवार योगेश नंदकुमार देशमुख, नसिम पठाण, शमिम मिर्झा, अजहर शहा, बाळु देशमुख, राजेंद्र जाधव, आमेर पठाण, शारदा सुनिल लाड, अभिमन्यु जाधव, हमदु चाऊस, राजु इंगळे, अरबाज कुरेशी, कुरेशाबी शमीम बेग, चंद्रकांत पगारे, शिलाताई अभिजित भारती, अब्दुल कदीर बापु, विशाल शेजुळ, राजु खिरे तसेच किसनराव खडके, राधाकिसन भोसले, रहेमान शेख, सलीम कुरेशी, गंगाधर कांबळे, शफीभाई महामंत्री, धनराज भारती, आपचे उमेदवार नारायण सोन्नी, मुजिब कादरी, नितीन शिवनकर, एजाज शहा, फैसल चाऊस, महेश औटी, मुमताज मदनी, इसरारखॉ पठाण, आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदार बंधु - भगिनी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.





Social Plugin