अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड सहकारी संस्थेच्या नोंदणी आणि जमिनीच्या खरेदी-विक्री प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सहदुय्यम निबंधक प्रविण माणिकचंद राठोड (वय ४२, व्यवसाय नोकरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपींनी संगनमत करून बनावट सदस्य नोंदणी, खोट्या स्वाक्षऱ्या आणि आधार पडताळणी प्रणालीचा गैरवापर करून खोटी दस्तऐवज तयार केल्याचे समोर आले आहे.या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी सहकारी संस्थेच्या नावावर अवैध जमीन व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४),३३६(२),३३६(३), ३(५) तसेच भारतीय नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(C) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस तपासात आरोपींकडून वापरलेली खोटी दस्तऐवज,डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची नोंद जप्त करण्यात आली आहे.काही आरोपींना अटक करण्यात आली असून,उर्वरित सहआरोपी व तांत्रिक पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे.
या गंभीर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके हे करत आहेत.





Social Plugin