आष्टी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरसुद्धा त्यांची लोकप्रियता कायम राहिली.
आष्टीः आष्टी मतदार संघाचे भाग्यविधाते तथा शिक्षण महर्षी, माजी आ. भीमराव थोंडे यांचा प्रमुख ५०० कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) पक्ष ११ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रवेश होणार आहे. मुंबईतील राष्ट्रवादी भवनामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष यांच्या आदि मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या पक्ष प्रवेश सोहळ्याची बीड जिल्ह्यासह राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. या पक्षप्रवेशामुळे राजकारणातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर भविष्यातील निवडणुकांमध्ये फार मोठा परिणाम या निमित्ताने पाहायला मिळेल असा अंदाज राजकीय जाणकारांकडुन व्यक्त होत आहे. माजी आ. भीमराव धोंडे हे गेल्या ४० वर्षाहून अधिक काळ सक्रिय राजकीय नेते म्हणून राजकारणात आहेत. राजकारण करताना त्यांनी समाजकारणाला अधिक महत्त्व देऊन विकासाच्या अनेक संकल्पना आष्टी, पाटोदा, शिरूर का. विधानसभा मतदार संघामध्ये राबवल्या. विविध शैक्षणिक संस्था, आरोग्य क्षेत्रातील विविध महाविद्यालय युवकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, भव्य व्यायाम शाळा, कृषी महाविद्यालय सुरु केले आहे. शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्यासाठी सध्या संघर्ष उभा केला आहे. एक अभ्यासू, शांत, शिस्तप्रिय आणि विकासाची गंगा मतदार संघात आणण्यासाठी एक निश्चित ध्येय ठेवून चालणारा राजकारणी अशी भीमराव धोंडे यांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात आहे.





Social Plugin