Ticker

6/recent/ticker-posts

श्री दत्त जयंतीनिमित्त निढळमध्ये गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर नाम, जप, यज्ञ सोहळा.



बुध दि .[ प्रकाश ] 

अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा संचलित दिंडोरी प्रणित  श्री. स्वामी समर्थ  श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्ट निढळ द्वारे श्री स्वामी समर्थ सेवा  या केंद्रात  याही वर्षी दि. 28 नोव्हेंबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत साक्षात परब्रम्ह स्वरुप गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व गुरुपुत्र दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7:00 वाजता नित्यस्वाहाकार , सकाळी 8:00 वाजता भूपाळी आरती, सकाळी 8:15 ते 11 वाजता गुरुचरित्र वाचन , सकाळी 10:30 वाजता नैवेद्य आरती , सकाळी 10:45 वाजता विशेष याग, दुपारी 2 ते 5  वाजता श्री. दुर्गा सप्तशती व श्री स्वामी चरित्र पाठ वाचन  , सायंकाळी 5:30 वाजता औदुंबर प्रदक्षिणा, संध्याकाळी 6: O0 वाजता महानैवेद्य आरती, संध्याकाळी 7:00 वाजता नित्यसेवा व नित्याध्यान होणार आहे.

गुरुवार दि. 27 नोव्हेंबर 2025 ग्रामदेवता मानसन्मान, मंडळ मांडणी. शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर 2025 मंडळ स्थापना, अग्नी स्थापना, स्थापित देवता हवन, गुरुचरित्र वाचन , शनिवार दि. 29 नोव्हेंबर 2025 नित्य स्वाहाकार, गणेश याग, मनोबोध याग. रविवार दि. 30 नोव्हेंबर 2025 नित्य स्वाहाकार श्री स्वामीयाग, सोमवार दि. 1 डिसेंबर 2025 नित्य स्वाहाकार, श्री गीताई या, मंगळवार दि. 2 डिसेंबर 2025 नित्य स्वाहाकार,

 दुर्गाचंडी याग. बुधवार दि. 3 डिसेंबर 2025 नित्य स्वाहाकार, शिवरुद्र याग, मल्हारी याग. गुरुवार दि. 4 डिसेंबर 2025 नित्य स्वाहाकार, बली पूर्णा । हुती, श्री दत्त जन्मोत्सव 12:39 वाजता, शुक्रवार दि. 5 डिसेंबर 2025 ८, श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन व अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहाचा , समारोह  इ. धार्मिक कार्यक्रम होणार आहेत . या कार्यक्रमाच्या खटाव - माण तालुक्यातील  भावीक-भक्त वेकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन समर्थ सेवकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. .