छाया - प्रकाश राजेघाटगे
पुसेगाव पोलिस ठाण्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुसेगाव दि .[प्रतिनिधी ] २६/११ रोजी मुंबई येथे शहीद झालेल्यावरिष्ठ पोलीस अधिकारी, जवानाचे स्मरणार्थ पुसेगाव - येथील पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची महिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी दिली. दरवर्षी अशाप्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्यात येते. या रक्तदान शिबिरात पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे ५१ रक्तदात्यानी सहभाग घेतला होता. यामध्ये महिलांचाही चांगला सहभाग होता .यावेळी विविध मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार, विद्यार्थी, गावोगावचे पोलीस पाटील, तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता .यावेळी वडूजच्या आयुष ब्लड सेंटरचे सहकार्य लाभले. रक्तदात्याना पोलिसांच्यावतीने अल्पोपहार तसेच प्रमाणपत्र देण्यात आले.





Social Plugin