Ticker

6/recent/ticker-posts

*अंबड नगरपरिषद निवडणुकीत भाजप–रासप महायुतीचा विकासदर्शी ‘रोडमॅप*’



*देवयानी केदार कुलकर्णी नगराध्यक्षपदी — उमेदवारांचा दमदार वचननामा जाहीर*

अंबड प्रतिनिधी,

गणेश सपकाळ

अंबड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा राजकीय तापमान वाढत असताना,भारतीय जनता पार्टी (भाजप)–राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) महायुतीने शहराच्या विकासाचा सर्वसमावेशक आराखडा जाहीर केला.

महायुतीकडून देवयानी केदार कुलकर्णी या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असून, त्यांच्यासह सर्व प्रभागातील महायुती उमेदवारांनी एकत्रित वचननामा जाहीर करत अंबड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प व्यक्त केला.

*४ मुख्य मुद्द्यांवर महायुतीचा भर –पाणी,स्वच्छता,सुरक्षा आणि रोजगार*

संयुक्त उमेदवारांनी अंबडच्या विकासाचे चार आधारस्तंभ मांडले असून दिर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांवर अंमलात येणाऱ्या ठोस उपाययोजना स्पष्ट केल्या.

*पिण्याच्या पाण्याचा प्रश्न*

देवयानी कुलकर्णी यांनी सांगितले की शहराचा सर्वात महत्त्वाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पुढील उपाय राबवले जातील.

*जायकवाडीमधून १० टीएमसी पाणी–अंबडसाठी राखीव ठेवण्याची प्रक्रिया पुढे.*

*नवीन पाणीपुरवठा योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून महायुतीच्या पाठपुराव्यामुळे ही योजना लवकरच शहराला मिळणार.*

*डावरगावची जुनी योजना पुनर्जीवित करून तात्काळ पाण्याची सोय.*

*उमेदवारांचे म्हणणे—“हे तीन उपाय अंबडच्या पाणीप्रश्नाला कायमस्वरूपी पूर्णविराम देतील*

*स्वच्छता—'स्वच्छ,सुंदर आणि हरित अंबड'ची घोषणा*

*महायुतीच्या उमेदवारांनी शहरातील स्वच्छतेसाठी पुढील योजना मांडल्या:*

१)नियमित आणि नियंत्रित कचरा संकलन व्यवस्था

२)नागरिकांसाठी सुलभ शौचालये प्राधान्याने उभारणे

३)शहराला आकर्षक स्वरूप देण्यासाठी वृक्षारोपण व हरित उपक्रम

उमेदवारांनी स्पष्ट केले—“अंबड स्वच्छतेच्या स्पर्धेत आघाडीवर आणू.”

४)सुरक्षा—संपूर्ण शहर CCTV निगराणीखाली.

५)मुख्य चौक,रस्ते,सार्वजनिक ठिकाणी संपूर्ण CCTV नेटवर्क

६)अंधाऱ्या भागात उच्च दर्जाची विद्युत रोषणाई.

७)महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा.

*महायुतीचा दावा—“अंबडला सुरक्षित शहर करणे हे आमचे पहिले प्राधान्य.”*

८)मुलांसाठी पार्क–युवकांसाठी रोजगार

९)नाना-नाणी पार्क,चिल्ड्रन पार्क विकसित करून कुटुंबांसाठी निवांत जागा

१०)युवकांसाठी नवीन व्यापार संकुल (Commercial Complex) उभारण्याचा संकल्प

११)छोटे–मोठे रोजगार त्वरित उपलब्ध होण्यासाठी व्यवसायांना प्रोत्साहन

*देवयानी कुलकर्णी यांचे वक्तव्य :“अंबडला आधुनिक सुविधा देणे हा आमचा संकल्प”*

वचननामा जाहीर करताना देवयानी केदार कुलकर्णी म्हणाल्या :                  

*> “अंबडला प्रगत,सुरक्षित,स्वच्छ,आधुनिक सुविधा असलेले शहर बनवणे.*

हा महायुतीचा सामूहिक संकल्प आहे.प्रत्येक प्रभाग समसमान विकसित करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी.”

महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले की,पाणीपुरवठा,रस्ते–नाले,आरोग्य सुविधा, उद्याने,वीजनिर्मिती,महिला–युवकांच्या समस्या या सर्वांवर‘‘सर्वसमावेशक काम’’ हिच विकासाची किल्ली असेल.

*मतदारांमध्ये उत्सुकता — विकास विरुद्ध स्थिरतेचा मुद्दा*

अंबड नगरपरिषद निवडणुकीत आता सरळ सामना महायुतीचा विकासदर्शी रोडमॅप विरुद्ध सध्याच्या स्थानिक समस्यांचा प्रश्न असा होणार हे स्पष्ट झाले आहे.महायुतीच्या वचननाम्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार झाली असून मतदार कोणाची बाजू घेतील हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे.