गणेश गावडे - पाटस प्रतिनिधी
अखेर पाटस ते हडपसर बंद झालेली पीएमपीएल बस सेवा बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ पासून सुधारित वेळापत्रकानुसार सुरू होत असून तसे परिपत्रक पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्याद्वारे काढण्यात आले आहे या अगोदर ही बससेवा फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झाली होती परंतु जून दरम्यान ती बंद करण्यात आली त्यानंतर पाटस ग्राम विकास फाउंडेशनने हडपसर ते पाटस ही बससेवा सुरू करण्याबाबत पुणे पीएमपीएल चे वरिष्ठ अधिकारी ओम प्रकाश बकोरिया यांना निवेदन दिले होते याच पार्श्वभूमीवर पाटस व पंचक्रोशीतील पुण्याला ये - जा करणाऱ्या अनेक नोकरदार ,विद्यार्थी ,ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी , व्यवसायिक यांच्यासाठी अत्यंत सोयीची असणारी ही बस सेवा अखेर सुरू करण्यात आली





Social Plugin