Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल पुसेगावमध्ये बालदिन उत्साहात साजरा.



बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]

   श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल पुसेगाव मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. हा दिवस आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला  जातो, असे मुख्याध्यापिका  कु.  धनश्री पोतदार यांनी सांगितले.  विद्यार्थ्यांनी वेगवेगळे  मनोरंजक खेळ  खेळले बालदिनाचा  आनंद घेतला.  त्यांना गोड खाऊ वाटप करण्यात  आला.  अशा रीतीने बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.