Ticker

6/recent/ticker-posts

ॲड. सुदर्शन सोळंके यांच्या भेटीमुळे संतोष सोळंके यांच्या प्रचाराला नवे बळ.

 


वैभव सोळंके/तालुका प्रतिनिधी 

२३ नोव्हेंबर/माजलगाव 

नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये वार्ड क्र. 7 ब (सर्वसाधारण पुरुष) येथून उभे असलेले संतोष भैय्या (संतोष सुुभाषबप्पा) सोळंके यांच्या प्रचार मोहिमेला आज मोठे बळ मिळाले. त्यांच्या माजलगाव येथील निवासस्थानी आदरणीय ॲड. सुदर्शन साहेब सोळंके यांनी विशेष भेट देऊन मनापासून शुभेच्छा दिल्या. या भेटीला राजकीय व सामाजिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

ॲड. सुदर्शन सोळंके यांच्या या पाठिंब्यामुळे समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रभागातील प्रचाराला नव्या जोमाने गती मिळाली आहे. यावेळी ॲड. पवन सोळंके साहेबांसह सुहास भैय्या सोळंके, गणु भैय्या सोळंके, गौतम आबा सोळंके, अशोक सर सोळंके, शहाजी  सोळंके, सचिन भैय्या सोळंके व मित्रपरिवार उपस्थित होता. 

दरम्यान, प्रभाग ७ मध्ये संतोष भैय्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. शिवकांत समाधी महाराज मंदिर विकास, महाजन वस्तीत केलेली कामे, तसेच परिसरातील समाजकार्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये मजबूत विश्वास निर्माण झाला आहे.

पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्तेविकास, प्रकाशव्यवस्था अशा मूलभूत प्रश्नांवर त्यांनी मांडलेल्या ठाम भूमिका आणि केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांची ‘विकासाभिमुख नेतृत्व’ ही प्रतिमा अधिक दृढ झाली आहे. साधेपणा, थेट संवाद आणि अडचणीला तत्काळ प्रतिसाद देण्याची वृत्ती यामुळे नागरिकांची त्यांच्याबद्दलची आपुलकी सातत्याने वाढते आहे.

ॲड. सुदर्शन सोळंके यांची आजची भेट ही संतोष सोळंके यांच्या प्रचारातील महत्त्वाचा टप्पा ठरल्याची चर्चा प्रभागभर सुरू आहे. तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून घराघरातील संवाद मोहिमेला नवी धार मिळाली आहे.

बदलते राजकीय समीकरण, नागरिकांचा वाढता विश्वास  आणि नेतृत्वाला मिळालेला मजबूत पाठिंबा पाहता प्रभाग ७ मध्ये संतोष सुुभाष बप्पा सोळंके यांची विजयी लाट अधिक वेगाने पुढे जाताना दिसत आहे.