Ticker

6/recent/ticker-posts

दानवे लोणीकर परतुर नंतर भोकरदन मध्ये एकाच मंचावर जालना जिल्हा त भाजपाची ताकद वाढणार



दानवे लोणीकर परतुर नंतर भोकरदन मध्ये एकाच मंचावर जालना जिल्हा त भाजपाची ताकद वाढणार 

भोकरदन प्रतिनिधी संजीव पाटील.


जालना/भोकरदन, दि. २४ (प्रतिनिधी)  
जालना जिल्हा राजकारणातील गेल्या बारा वर्षांतील सर्वात मोठी घटना रविवारी आणि सोमवारी सलग दोन दिवसांत घडली. रविवारी परतूर येथे १२ वर्षांनंतर रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर एकाच व्यासपीठावर आले आणि सोमवारी लोणीकरांनी दानवेंच्या भोकरदन मतदारसंघात पाऊल ठेवत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. या दोन दिवसांच्या घडामोडींनी जिल्ह्यातील भाजप एकसंघ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, आगामी महानगरपालिका  नगरपरिषद, जिल्हा परिषद आणी पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचा डंका वाजणार हे निश्चित झाले आहे.

शनिवारी (दि. २२) परतूर येथे आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी १२ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावरून संबोधित केले. दानवे यांनी जाहीर केले की, “गेल्या बारा वर्षांचे सगळे मतभेद आम्ही गंगेला मिळवले. आता जिल्ह्यात खरी एकजूट आहे.” त्यांनी पुढे मोठी घोषणा करताना सांगितले, “ लोकसभा मतदारसंघातून भाजपचे तिकीट बबनराव लोणीकर यांनाच मिळावे यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार.” प्रत्युत्तरात आमदार लोणीकर यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना सांगितले, “ही माझी परतूर-मंठा विधानसभेतील शेवटची टर्म आहे. आता भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले.

*सोमवारी भोकरदन : मैत्रीची कृती* 

सोमवारी परतूर येथे दानवे यांनी लोणीकर यांना भोकरदन येथील प्रचार कार्यालय उद्घाटनाला येण्याचे जाहीर निमंत्रण दिले होते. त्यानुसार सोमवारी (दि. २४) सकाळीच आमदार लोणीकर घनसावंगी, जालना विधानसभा मतदार संघात असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भोकरदनला दाखल झाले. माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार विलासराव खरात, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांच्यासह प्रचंड वाहनांची रांग निघाली. वाटेत राजूर येथील राजुरेश्वर गणपती मंदिरात लोणीकर यांनी दर्शन घेऊन विशेष पूजा केली या वेळी शिवाजी थेटे आणी संजय पोकळे यांनी आमदार लोणीकर यांचे स्वागत केले. या वेळी भास्कर दानवे यांनी राजूर संस्थांच्या वतीने श्री गणेशाची प्रतिमा आमदार लोणीकर यांना देऊन गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात स्वागत केले या वेळी “रावसाहेब दानवे यांच्याशी झालेली मैत्री कोणाच्या नजरेला लागू नये,” असे साकडे घातले. जालना ते भोकरदन रस्त्यावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी ही आमदार लोणीकर यांचे स्वागत केले. दोन्ही बाजूला बॅनर पोस्टर झेंडे, “दानवे-लोणीकर एकत्र… अस चित्र पाहायला मिळाल.

*भोकरदनमध्ये आमदार लोणीकर यांचे जल्लोषमय स्वागत*
भोकरदन शहरात लोणीकर यांचे स्वागत ढोल-ताशे, फटाके आणि फुलांचा वर्षाव करून झाले. महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी उसळली.

*एकाच व्यासपीठावर दिग्गजांची मांदियाळी*
व्यासपीठावर खालील दिग्गज एकत्र होते :
 
- माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील  
- आमदार बबनराव लोणीकर  
- माजी केंद्रीय मंत्री खा. डॉ. भागवत कराड  
- भोकरदनचे आमदार संतोष दानवे  
- माजी आमदार कैलास गोरंट्याल  
- माजी आमदार विलासराव खरात  
- निर्मलाताई दानवे  
- जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे  
- प्रदेश चिटणीस सुरेश बनकर 

 *प्रमुख भाषणे :*  

आमदार बबनराव लोणीकर :  
“रावसाहेबांनी मला स्वतः भोकरदनला बोलावले. आज मी त्यांच्या मतदारसंघात आलो याचा अर्थ जिल्ह्यातील गटबाजी कायमची संपली. आशाताई माळी आणि सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करा.”

रावसाहेब दानवे पाटील :  
“बबनराव लोणीकर माझ्या मतदारसंघात पाऊल ठेवले म्हणजे खरी एकजूट दिसली. भोकरदन नगर परिषद २० वर्षांपासून काँग्रेसच्या गुलामीत आहे. आता मुक्तीची वेळ आली. आशाताई माळी नगराध्यक्ष होतीलच!”

आमदार संतोष दानवे :  
“भोकरदनमध्ये जाती-पातळीचे राजकारण थांबवा. आशाताई माळी आणि सर्व १० प्रभागांतील महायुतीचे उमेदवार विजयी करा. भोकरदनचा कायापालट करू.”

माजी आमदार कैलास गोरंट्याल :  
“जालना शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवला. हजारो कोटींचा निधी दानवे साहेबांनी आणला. आता जालना महानगरपालिकाही १०० टक्के भाजपची होईल, पहिला महापौरही भाजपचाच!”

डॉ. भागवत कराड :  
“लाडकी बहिण, पीएम किसान, जनआरोग्य, आवास योजना… महायुतीने सर्वांना न्याय दिला. भोकरदनकरांनी कमळाच्या बटनावर बोट ठेवले की विकासाची गंगा खोऱ्यात येईल.”

या दोन दिवसांच्या घडामोडींनी जालना जिल्ह्यातील भाजप एकसंध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपरिषदांपासून महानगरपालिकेवरही भाजपाची निर्विवाद सत्ता येईल हे स्पष्ट झाल आहे.