प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
दिनांक 16/11/2025 संत संताजी कॉन्व्हेंट येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची भव्य बैठक उत्साहात पार पडली. समाज संघटन मजबूत करण्यासाठी तसेच नव्या नेतृत्वाचा शोध घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत पाखरे होते. प्रमुख निरीक्षक म्हणून विभागीय सचिव रमेश अकोटकर होते.
यावेळी त्यांनी समाजातील बदलत्या परिस्थितीवर प्रकाश टाकत "समाजासाठी वाहून घेण्याची वेळ आता आली आहे. जानेफळ मेहकर शहरातीलआणि संघटनातील सक्रिय सहभागाला सर्व सदस्यांनी एकमताने दाद दिली. तसेचसंघटन भक्कम असेल तरच समाज प्रगत होतो," असे आवाहन केले. बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राऊत, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर गायकवाड, डॉ. गंगाधर क्षिरसागर, श्रीकृष्ण वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील विविध प्रश्न, युवकांच्या संधी, महिलांचे सक्षमीकरण आणि संघटन विस्तार या विषयांवर विस्तृत चर्चा झाली. या बैठकीत महासभेच्या जिल्हा संघटनेच्या निवडीसाठी निवड प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. यामध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी सुभाष बबनराव देव्हडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वगुणांना, समाजासाठी केलेल्या कामांना जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदेव : नंदकिशोर क्षिरसागर, सचिव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष विजय सोनुने, प्रसिद्धी प्रमुख अशोक इंगळे यांची ही सर्वानुमते निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीचे सर्व मान्यवरांनी स्वागत करत त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. नव्या पदाधिकाऱ्यांनीही समाजहिताला प्राधान्य देऊन संघटन अधिक बळकट करण्याचे आश्वासन व्यक्त केले. विशेष म्हणजे, घाटावरील सहाही तालुक्यांतील समाजबांधव या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. समाजातील एकता, संवाद वाढवणे आणि युवा शक्तीला दिशा देणे या बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट होते. उपस्थित मान्यवरांनी समाजातील विविध उपक्रम राबवण्यासाठी
एकत्र येण्याचेया बैठकीतून नव्या नेतृत्वाची निवड झाल्यामुळे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या संघटन कार्याला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. समाजहिताच्या कामासाठी सर्व स्तरावर उत्साह दिसून आला. नवीन कार्यकारिणीच्याआवाहन केले. निवडीमुळे जिल्ह्यात समाजिक चळवळींना नवीन गती मिळणार आहे, अशी भावना या बैठकीतून व्यक्त झाली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन उप





Social Plugin