ग्रामीण प्रतीनीधी :: दिग्विजय पवार
:: खंडाळा :: वैजापुर तालुक्यातील अनेक गांवामध्ये व वाडी वस्त्यावंर बिबट्याने थैमान घातले आहे . वाड्या वस्तीवरील शाळेतील मुले बिबट्याच्या भितीने शाळेत येन्यासाठी घाबरत आहे . सध्या सुगीचा हंगाम आसल्यामुळे शेती काम जोरात चालु आहे , मका सो़गणी कामांना पन वेग आला आहे . एक तर मजुर मिळत नाही , व त्यामध्ये बिबट्याची भिती या मुळे शेतकरी परेशान झाला आहे , बिबट्याच्या भिती मुळे प्ररप्रांतीय काम करनारे मजुरांनी पन धसका घेतला आहे , आज इथ दिसला तिथ दिसला या चर्चा ना उधान आले आहे वन विभाग सुचना देऊन मोकळे झाले आहे , काही परिसरामध्ये बिबट्याने शिकार केलेले हरण सापडले आहे त्यामुळे परिस्थीती आधिकच भीती दायक तयार झाली आहे . राञी च्या वेळी शक्यतो शेतात जाऊ नका व आपले जनावरे सुरक्षित ठिकानी बांधा . लहान मुलांना एकटे कुठ पाठऊ नका . व अफावर विश्वास ठेऊ नका , आशे आव्हान ग्राम सुरक्षा यंञंने द्वारे देण्यात आले आहे





Social Plugin