जाचक अट रद्द करण्याची शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी।
जाचक अट रद्द करण्याची शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी।
भोकरदन प्रतिनिधी संजीव पाटील
सी.सी.आय. कापूस खरेदी केंद्रावर हेक्टरी बारा क्विंटल कापसाची खरेदी ची अट शेतकऱ्यांना ठरते जाचक अट रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी । भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील। भोकरदन तालुक्यातील भोकरदन राजुर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या सि.सि.आय कापूस केंद्रांवर एकरी तीन क्विंटल नव्वद किलो कापुस खरेदी करण्यात येत असुन एका हेक्टर साठी 12 क्विंटल 25 किलो कापूस खरेदी करण्यात येत असुन बाकी उरलेला कापूस परत आणण्याची वेळ जानेफळ मिसाळ येथील शेतकरी भाऊ साहेब पांडुरंग मिसाळ यांनी राजुर केंद्रावर टेंपो भरुन कापूस विक्रीसाठी आणला उरलेला अर्धा टेम्पो परत घरी आणावा लागला.कैलास भाऊराव बोडखे जानेफळ मिसाळ यांनी 28 क्विंटल कापूस मोजला बाकी उरलेला परत आणावा लागला.मागील वर्षी एक हेक्टर साठी 30 क्विंटल ची अट घातली होती.या वर्षी एका हेक्टर साठी 12 क्विंटल 25 किलो कापूस खरेदी ची आणि एक एकर साठी 3 क्विंटल 90 किलो खरेदी ची जाचक अट नियम घालण्यात आला आहे. एकीकडे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सी.सी.आय कापूस केंद्रांवर भोकरदन,राजुर केंद्रावर ही जाचक अट असुन जालना जिल्ह्यांतील सर्वच सी.सी.आय.कापुस खरेदी केंद्रावर ही अट असल्याचे शेतकऱ्यांनी. सांगितले . शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे . भोकरदन तालुक्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे अगोदरच उत्पादन घटले असुन.शेतकरी अडचणीत सापडला आहे. सी.सी.आय. कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी नुसता फार्स ठरत आहे.
खरेदी ची जाचक अट रद्द करण्याची मागणी. कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरु असलेल्या सी.सी.आय . कापूस खरेदी केंद्रावरील ही जाचक अट रद्द करावी.आणि मागील वर्षी प्रमाणे एका हेक्टर साठी 30 क्विंटल खरेदी करण्यात यावी.अशी रास्त मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. या अवास्तव जाचक अटीमुळे शेतकऱ्यांची डोकं दुःखी वाढली असुन उरलेल्या कापसाचे काय करावे असा प्रश्न पडला आहे या संकटातून शासनाने मार्ग काढावा आणि जाचक नियम अट रद्द करावी अशी रास्त मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.।भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील.।
.jpg)




Social Plugin