Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचा मोर्चा धडकणार 15 डिसेंबर ला विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर.

 


जितेंद्र बहेकार प्रतिनिधी आमगाव

आमगाव,सध्या नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी दिनांक 1 डिसेंबर पासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन अनिश्चित काम बंद आंदोलन पुकारला असून,या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद व संघटनेच्या वतीने केलेल्या मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने दिनांक 15 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र ग्रामपंचायत परिचालक संघटनेच्या वतीने नागपूर येथे महामोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चात ग्रामपंचायत परिचालकांच्या मागील थकीत मानधन कोरोना काळात दिलेल्या आपत्कालीन सेवांबद्दलच्या प्रोत्साहन भत्ता पगार वाढ सेवेचे स्वरूप आणि शासकीय दर्जा, मानधनाची तारीख निश्चित करणे कामाची व्याप्ती व मार्गदर्शन सूचनेवर अंमलबजावणी अश्या अनेक मुख्य मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून सरकार कडे ठेवणे आहे. अशी माहिती गोंदिया जिल्हा ग्रामपंचायत परिचालक संघटना आमगाव  तर्फे देण्यात आली आहे.