Ticker

6/recent/ticker-posts

पेट्रोल पंपावर 'कॅश' असेल तरच मिळेल इंधन; ऑनलाईन पेमेंट बंदमुळे वाहनधारकांचे हाल





पत्रकार: लक्की राठोड मांडवी नांदेड

दि.11 डिसेंबर मांडवी येथील एन. आर. पेट्रोल पंप वर ऑनलाईन पेमेंट घेण्यास नकार दिला जात असल्याने वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत. "सर्व्हर डाऊन आहे" किंवा "स्कॅनर चालत नाहीये" अशी कारणे देऊन केवळ रोख रक्कम (Cash) स्वीकारली जात असल्याने पंपावर वादाचे प्रसंग घडत आहेत.एकीकडे शासन 'कॅशलेस' व्यवहारांना प्रोत्साहन देत असताना, दुसरीकडे अत्यावश्यक सेवेमध्ये ऑनलाईन पेमेंट नाकारले जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अचानक ऑनलाईन पेमेंट बंद झाल्याने, ज्यांच्याकडे रोख रक्कम नाही, त्यांना पेट्रोल न भरताच माघारी फिरावे लागत आहे.हातात मोबाईल आहे, खात्यात पैसे आहेत, पण गाडीत पेट्रोल टाकता येत नाहीये. कारण पेट्रोल पंपांनी आता ऑनलाईन व्यवहारांवर अघोषित संप पुकारला आहे. मांडवी मधील  पंपावर 'युपीआय' चालत नसल्याचे फलक सुद्धा लावलेले नाही आहेत."

डिजिटल इंडियाचा फज्जा उडालाय का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण, पेट्रोल पंपावर आता ऑनलाईन पेमेंट घेण्यास चक्क नकार दिला जातोय. पाहुयात आमचा हा ग्राऊंड रिपोर्ट..."