बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
फेडरेशन ऑफ इंडियन ब्लड डोनर्स सहयोगी महाराष्ट्र मधील हर्ष फॉउंडेशन या संस्थाने लोकसभा खासदार डॉ अजित माधवराव गोपछडे यांचे जाहीर आभार आणि अभिनंदन केले .रक्त आणि रक्तदाता संदर्भात जे प्रॉब्लेम्स येतात त्याबद्दल हर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष आप्पा घोरपडे यांनी फेडरेशन ऑफ इंडियन ब्लड डोनर्स ऑर्गनायझेशन आणि राष्ट्रीय ब्लड ट्रान्सफ्यूशन समिती NBTC यांच्या समोर दिल्लीमध्ये प्रश्न प्रस्तावित केले होते.
खासदार डॉ . अजित माधवराव गोपछडे यांनी राज्यसभेत काल नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन बिल (विधेयक)) मांडले. हे विधेयक राज्यसभेत मांडले गेल्यामुळे रक्त आणि रक्तदाता यांच्या बद्दल रक्तदानाची जनजागृती होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.देशात रक्तदान सेवा आधुनिक तसेंच रक्तदान सुरक्षित सर्व रुग्णांच्या पर्यंत रक्त पुरवठा होण्यासंदर्भात कायदा करण्यासाठी फेडरेशन ऑफ इंडियन ब्लड डोनर्स ऑर्गनायझेशन गेली 15 वर्षे झाले सतत प्रयत्न करीत होती. महाराष्ट्र मधून हर्ष फाउंडेशन यांच्यामार्फत रक्तदानचे कार्य चालत असते.
हर्ष फाउंडेशनचे आप्पा घोरपडे यांनी रक्तदान आणि रक्तदाता यांच्या सुरक्षितता बद्दलचे महत्त्वाचे विषय कॉन्फरन्स मध्ये मांडण्यात आले होते. रक्तदाता यांची सुरक्षिता ही खूप महत्त्वाची आहे. रक्तदाता हा देव नाही पण देवा पेक्षा कमी नाही असे स्पष्ट मत आप्पासाहेब घोरपडे यांचे आहे राज्यसभा खासदार डॉ . अजित माधवराव गोपछडे यांच्यामुळे रक्त आणि रक्तदाता संदर्भात होणारे समस्या आणि त्यांची सुरक्षितता याच्याबद्दल सरकारमधून संयोग होण्यास आता मदत होणार आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन ब्लड डोनर्स ऑर्गनायझेशन आणि हर्ष फाउंडेशन यांनी सर्व राजनीतिक पार्टी, राज्यसभा तसेंच लोकसभा सर्व खासदार या सर्वांना हा आग्रह केला आहे की हे विधेयक लवकरात लवकर पास करण्यासाठी सहकार्य व्हावे आणि रक्त व रक्तदाता बद्दलची सुरक्षितता याबद्दल जनजागृती होण्यास मदत होईल आणि देशात रक्तदान करण्यासाठी नवयुवकांना प्रेरणा मिळेल
FIBDO चे राष्ट्रीय अध्यक्ष बिस्वरूप विश्वास यांनी हे विधेयक म्हणजे रक्त तसेच रक्तदाता आणि रक्ता संदर्भात कायदे होण्यासाठी हे विधेयक ऐतिहासिक कदम आहे असे ते बोलले.





Social Plugin