बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
आदर्श गाव योजना 2025:26 साठी गारवडी ता, खटाव यांचे वतिने सदर योजनेत गारवडी गावचा समावेश व्हावा म्हणून शामनाकडे जो प्रस्ताव सादर केला होता त्याची पडताळनी करण्यासाठी राज्यस्तरीय कमेटी गारवडी येथे आली होती. त्या निमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. गावातील सर्व ग्रामस्थ , महिला वर्ग ,तरुण वर्ग, मोठ्या प्रमाणात उपस्तीत होता.
राज्यस्तरीय समितीमध्ये प्रामुख्याने.वसंत विनवडे, कृषी उप-संचालक आदर्श गाव योजना, सुदर्शन वायसे मंडळ कृषी अधिकारी व सुरेश शिंदे-उप कृषी अधिकारी आदर्श गाव योजना यांचा प्रामुख्याने समावेश होता . खटाव तालुक्याचे गटविकास अधिकारी योगेश कदम, ताजुका कृषी अधिकारीविक्रम वाघमोडे , उपकृषी अधिकारी संतोष शिंदे, मंडळ कृषी अधिकारी, अक्षय सावंत, सहायक कृषी अधिकारी - सौ दिपा बोराटे, ग्राम महसुल अधिकारी अजय माने, ग्रामविस्तार अधिकारी भिमराव टिळेकर, मंडल कृषी अधिकारी पुसेगाव व कार्यक्षेत्रातील सर्व कृषी अधिकारी, वनपाल पुसेगाव. श्री एस . वि ..सागर व बायफचे विभागीय व्यवस्थापक विशाल गांगुर्डे , उपस्थित होते.
प्रास्तवीक समर्थन ग्रामकार्यकर्ते भरतकुमार काळे योनी केले . सभेच्या मार्गदर्शन मा वसंत विनवडे कृषी उप संचालक आदर्श गाव योजना यांनी सांगीतले कीआम्ही गावात आल्या नंतर प्रथम गावफेरी व शिवार फेरी केली. त्यावेळी तुमचे गावाने स्वच्छतेचा वसा घेतल्याचे दिसून आले, गावातील रस्ते स्वच्छ दिसले . . घर तिथे सौचालय दिसले, गावात एकीची भावना दिसली . मंडळ कषी अधिकारी सुरेश शिंदे यांनी -मंडळ कृषी अधिकारी आदर्श गाव योजना प्रस्तावाच्या पडताळणीत गावकऱ्यांशी संवाद सादलाअसता गावकऱ्यांनी सर्व प्रश्नांची उत्तर बरोबर दिली. त्यावेळी वसंत बिनबडे यांनी सांगीतले की तुमच्या गावाने सर्व निकष पुर्ण केले आहेत. ग्रामसभेची तयारी चांगली दिसून आली . तुम्ही पडताळणीत पास झाला आहात. तुमच्या गावचा प्रस्ताव पडताळणी अहवाल आम्ही अंतीम मान्यतेसाठी आदर्श गाव योजना कार्यकारी समितीत सादर करू .
आदरी गाव योजनेतून गावाचा संपुर्ण कायापालट होईल. गावात पाणलोट विकास कामे होतील, त्यातून गाव जलसमृद्ध होईल त्याच बरोबर रस्ते , गटारे व इतर विकास कामे होतील कृषीविकास, शेतकरी, भुमिहिन , .महिला सक्षमीकरण अशा विविध विषयावर सभेला मार्गदर्शन करून सदर योजना ही. गावची गावासाठी गावक-यांनी राबवलेली योजना आहे. म्हणून लोक .सहभागातून चांगली दर्जेदार कामे करा. आदर्श गाव योजनेतून गावचा उध्दार करा ,वादविवाद बाजुला करुण आलेल्या संधीचे सोने करा. असे मार्गदर्शन व मनोगत आदर्श गाव योजनेचे कृषिउपसंचालक वसंत बिनवडे योनी ग्रामसभेत व्यक्त केले.
गटविकास अधिकारी विकास योगेशजी कदम यांनी ही गावाच्या संदर्भात विविध विषयावर चर्चा करून सभेस मार्गदर्शन केले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच . सौ कमल उत्तम कदम होत्या . गावचे युवा नेते पै. शिवाजीराव नारायण शेडगे, उप सरपंच- विकास मोहन कदम, पोपटराव बिटले , पोलीस पाटील ज्योती कदम , माजी सरपंच नामदेव कदम , गावातील सर्व महिला गट , आजी माजी सैनीक संघटना, जय हनुमान गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते ,उमाजी नाईक मित्र मंडळ, गावातील सर्व महिला वर्ग ,पुरुष व तरुणाई मोठ्या प्रमाणात उपस्थीत होती. यावेळी आदर्श गाव योजनेत हिरिरिने भाग घेऊन योजना राबवण्याचा निर्धार सर्वानुमते केला . आभार शिवाजीराव शेडगे यांनी मानले .





Social Plugin