Ticker

6/recent/ticker-posts

जव्हारचे बांधकाम कार्यालय पालघरला हलविण्याच्या हालचाली ! तरी आमदार आणि खासदार का गप्प बसून आहेत ??

 



सौरभ आहेर प्रतिनिधी  मोखाडा

 पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार दोन वेगवेगळ्या कार्यालयामार्फत चालविला जातो. यामध्ये वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या तालुक्यांसाठी पालघर सार्वजनिक बांधकाम विभाग तर बाडा, जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या चार तालुक्यांसाठी जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयामार्फत विविध विकासकामे केली जातात. मात्र सध्या अनेक घोटाळ्यांमुळे जव्हारचे सार्वजनिक बांधकाम कार्यालय हे हिट लिस्टवर आल्यामुळे आता हे कार्यालय पालघर या ठिकाणी हलविण्याच्या हालचाली बरिष्ठ कार्यालयाकडून सुरू असल्याचे चित्र आहे. तर असाही या कार्यालयातील एकूणच कारभाराबाबत बरिष्ठ कार्यालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पूर्वग्रह दुषित दृष्टिकोन असल्याचे काही जर्णाकडून आता सांगण्यात येत असून त्यातूनच आता या घोटाळ्याचे निमित्त सांगून हे कार्यालय पालघर येथे हलविणे किंवा पालघरच्या सार्या कार्यालयात एकत्रीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

जव्हारमधील विविध कार्यालतील कारभार हा याआधी सुद्धा जिल्हा मुख्यालयातून चालत होता. त्यामुळे अनेक कारणे सांगून येथील कार्यालये पालघर जिल्हा मुख्यालयात नेण्याच्या या शासकीय कारभारामुळे जव्हारचा उपजिल्हयाचा दर्जा फक्त कागदावर ठेवायचा आहे काय? असाही सवाल आता या निमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान जव्हार तालुक्यातील बालमृत्यू प्रकरण प्रचंड गाजल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांनी या भागातील आदिवासी गावपाड्यांचा येथील सर्वसामान्य लोकांचा विकास व्हावा शासनाच्या योजना येथील गोरगरिबांच्या दारात पोहोचाव्यात यासाठी ठाणे जिल्हा असताना जव्हारला उपजिल्ह्याचा दर्जा देऊन या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि विविध शासकीय कार्यालय सुरू केली होती. यानंतर ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा हा स्वतंत्र झाला तेव्हा सुद्धा कार्यालयाचे स्थलांतर होवू नये यामुळे कारभार पारदर्शक व्हावा प्रष्टाचाराला वाव मिळू नये यासाठी चांगले अधिकारी या ठिकाणी द्यावेत अशा अनेक बाबी घडवून या

कार्यालयतील कारभार सुधारू शकतो आणि ती शासनाची जबाबदारी मुद्धा आहे. मात्र कोणत्यातरी घोटाळ्याचा आधार घेऊन बेट कार्यालय पालघरला हलविणे हा यावेळी उपाय नसल्याचे आता या भागातील ठेकेदारांचे म्हणणे आहे यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे कार्यालय पालघर येथे हलवू नये अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जिल्ह्याचे मुख्यालय जव्हार या ठिकाणी व्हावे अशी मागणी असताना हे मुख्यालय पालघर या ठिकाणी झाले. मात्र यानंतर सुद्धा जव्हारचा उपजिल्हाचा दर्जा आणि येथील कार्यालय कायम सुरू राहावीत अशी मागणी होत असताना सुद्धा कार्यालय जव्हार मध्येच आहेत मात्र ह्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मात्र पालघर जिल्ह्याच्या मुख्यालय बसत असल्याने जव्हारचा उपजिल्हाचा दर्जा हा कागदावरच राहत आहे. आज सुद्धा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक महत्वाचे विभाग हे पालघर मुख्यालयातूनच चालत आहेत तर जिला परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यालय सुद्धा शेवटच्या पटका मोजत आहे. अशावेळी जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग हे कार्यालय मात्र या चारही तालुक्यातील विकास कामांच्या दृष्टीने

महवाये मानले जात होते. गेल्या काही वर्षात या कार्यालयामार्फत करण्यात आलेली कामे आणि येथील घोटाळे आणि या घोटाळ्यातील कोट्यावधीची आकडेवारी हे पाहता हे कार्यालय बंद करण्याच्या हालचाली आता वरिष्ठ कार्याकडून सुरू असून बांधकाम कार्यालय पालघर या ठिकाणी हलविण्याचा व पालघर येथील बांधकाम कार्यालयातूनच या कार्यालयाचा कारभार करता येईल का या संदर्भात आता कार्यवाही सुरू असल्याचे बोलले जात आहे. यामुळे या भागातील ठेकेदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र या कार्यालय बद्दलचा पूर्वग्रह दषित रश्किोन घेऊन हे कार्यालय जाणीवपूर्वक पालघर येथे हलवून जव्हारचा उपजिलाचा दर्जाच काढून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे ठेकेदार संघटनेचे म्हणणे आहे.