आंतरशालेय युवा कबड्डी लीग स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली
भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
उमरेड युथ फाउंडेशन च्या द्वारा आयोजित यंदाचा युवा महोत्सवचा आंतरशालेय युवा कबड्डी लीग स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.माजी आमदार सुधीर पारवे यांचे हस्ते उद्घाटन झाले.यावेळी मंचावर , ज्येष्ठ व्यवसायिक किराणा व्यापारी अशोक मने,बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स दिलीप सोनटक्के, नंदकिशोर धोटे,उमरेड युथ फाउंडेशन चे संस्थापक अनिलकुमार गोविंदांनी अध्यक्ष दीपक पटले , संयोजक सचिन कुहीकर,पूर्वाध्यक्ष प्रदिप चिंदमवार ,संजय मौदेकर ,राजेश जिकार यांची उपस्थिती होती. *प्रास्ताविक मध्ये युवा महोत्सव मध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा दीपक पटले यांनी मांडली
संस्थापक अनिलकुमार गोविंदांनी यांनी आपल्या मार्गदर्शनात सलग 11 वर्षापासून घेत असलेल्या युवा महोत्सव बद्दल माहिती दिली.तर प्रमुख पाहुण्यांनी विविध कार्यक्रमाची यशस्वीपणे पार पडल्याबद्दल उमरेड युथ फाउंडेशन ची प्रशंसा केली व सर्वांना वर्तमान काळात खेळांचे महत्व पटऊन दिले आणि युवा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
मुले व मुली यांचे चार गटात ही स्पर्धा खेळल्या गेली.यामधे एकूण २७ संघ सहभागी झाले.वर्ग ९ ते १० मुले गटामध्ये जीवन विकास विद्यालय ने बाजी मारली तर उपविजेता संस्कार विद्यासागर ठरला. मुलीं मध्ये अशोक कन्या विद्यालय विजेता संघ व उपविजेता जीवन विकास विद्यालय ठरला. वर्ग ६ ते ८ मुले गटामध्ये विजेता संघ अशोक विद्यालय व उपविजेता देवराव इटनकर पब्लिक स्कूल आणि मुलीं मध्ये विजेता अशोक कन्या विद्यालय व उपविजेता जीवन विकास विद्यालय ठरला.या संपुर्ण गटामध्ये बेस्ट रेडर ओमकार ठाकरे,मुकेश बावनकर,सिमरन तिरपुडे,कृष्ण लडी,बेस्ट कॅचर शौर्य श्रावने,दक्ष ब्रम्हे,नव्या यादव, जीविका अड्डक व बेस्ट ऑलराऊंडर प्लेयर मनीष कंगाले,गुंजन मोंढे हिमांशू ठाकूर,गुणगुण तांबेकर यांनी वयक्तिक पारितोषिके पटकावली. निरीक्षक सुधाकर कोळसे,पंच म्हणून स्वप्नील गवळी,चंद्रकांत वंजारी, आचल वंजारी,अविनाश नरुले,प्रशांत उताणे,निखिल बावणे,मनिषा बजाज,पद्माकर भोयर, यांनी जबाबदारी पार पाडली. स्कोअर म्हणून पवन उऱ्हाडे,निकिता इंगोले,यांनी भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे *संचालन समर भगत नी केले व सचिव गौरव रहाटे यांनी आभार मानले*.यशस्वितेसाठी विजय जैस्वानी,प्रांजल डहाके,आशिष वंजारी,रितेश राऊत,स्वप्निल गवळी,संजय चाचरकर, पवन मडावी,श्रीकांत बोरकर,,सौरभ भिवगडे,शुभम सिर्सिकर,नरेंद्र बालपांडे,पवन उऱ्हाडे मुकेश गौतम,प्रवीण लाडेकर, सुरेश तिवाडे,हितेश गडबोडिकर,अक्षय श्रीखंडे ,गौरव मिश्रा,,आदींनी सहकार्य केले.





Social Plugin