Ticker

6/recent/ticker-posts

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता परिसंवाद कार्यक्रम- AI ला आपला सहाय्यक म्हणून तयार करा.भविष्य हे मशीनचे नाही तर मानवाचे आहे...प्रा.विजय राठोड

 




AI चे फायदे व नुकसान दोन्ही आहे.रोजगार जाणार नाही तर त्याचे स्वरूप बदलणार,जगातील प्रश्न एका ठिकाणी बसून सोडविता येणार.... विनयजी चावला.

उमरेड: उमरेड युथ फाउंडेशन द्वारा आयोजित युवा महोत्सव 2025 अंतर्गत स्थानिक स्व. देवरावजी इटनकर आय.टी.आय. येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रोजगाराची भविष्यातील आव्हाने  या विषयावर परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे प्रायोजक मे. रजा ट्रेडर्स चे संचालक अयुबभाई शेख व प्रमुख वक्ते

महा.कार्यकारिणी सदस्य, समरसता साहित्य परिषद चे

प्रा. विजय राठोड

सहवक्ते मोटीवेटर अँड ट्रेनर विनय चावला, महिला कला महाविद्यालय चे प्रा. उपेंद्र बागुल, सेवानिवृत मुख्याध्यापक व वरिष्ठ पत्रकार कृष्णकुमार मिश्रा, युवा उद्योजक, शिवकाशी डेव्हलपर्स अँड बिल्डर्स चे वसंता डांगरे ,संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदांनी, अध्यक्ष दीपक पटले,संयोजक सचिन कुहीकर,संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार,पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर,स्व.देवराव इटनकर ITI चे प्रा. प्रशांत गिरडकर ,यांची प्रामुख्याने मंचावर उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरवात द्वीप प्रज्वलनाने विधिवत उद्घाटन करून झाली.उपस्थित सर्व वक्त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना AI नवीन टेक्नॉलॉजी विषयी सविस्तर माहिती देऊन चर्चा केली. भविष्यातील भारत कसा असणार,जगाच्या पटलावर भारत देश या टेक्नॉलॉजी चे माध्यमातून विकसित भारत म्हणून उदयास येणार त्या मध्ये आपली सर्वांचे योगदान महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे संचालन समर भगत यांनी केले तर आभार दीपक पटले यांनी मानले. यशस्वितेसाठी संजय चाचरकर, विजय रामटेकर, दिनेश ढेबुदास, रितेश राऊत, विक्रांत वरघणे, सतीश चकोले, सचिन जोधे, किशोर आदमने, आशिष वंजारी, सतीश तांबेकर, तसेच शाळेतील शिक्षकवृंद यांचे सहकार्य लाभले.

दिनांक.१९.१२.२०२५

भाग्यश्री धकाते - उमरेड ग्रामीण प्रतिनिधी