Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा लाड शहरा मध्ये नगरपरिषद निवडणुकीपूर्वी ईव्हीएम तयारीला वेग.



कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे 

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारंजा येथे मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम यंत्रांची तयारी प्रक्रिया स्थानिक शेतकरी निवास येथे अत्यंत काटेकोरपणे पार पडली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मशीनची तपासणी, चाचणी आणि सीलिंगचे काम दिवसभर सुरू राहिले.

या प्रक्रियेला निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार कुणाल झाल्टे, तसेच मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले. सर्व यंत्रे योग्य स्थितीत आहेत याची खात्री करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांनी प्रत्येक मशीनची बारकाईने पाहणी केली. तपासणीदरम्यान करण्यात आलेली कामेः प्रत्येक ईव्हीएमचीअधिकाऱ्यांची धावपळ, सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

क्रमवार तपासणी, कॅन्टिडेट सेटिंगची पडताळणी, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटची जोडणी तपासणे, व्हीव्हीपॅटची कार्यक्षमता आणि प्रिंटिंग चाचणी, मशीन सीलिंग प्रक्रिया, यावेळी विविध उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे होत असल्याची प्रत्यक्ष खात्री करून घेतली. कोणताही गैरसमज अथवा शंका राहू नये म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी सतत उपस्थित राहून मार्गदर्शन करत होते. दरम्यान, सुरक्षा व्यवस्थेतही लक्षणीय वाढ करण्यात आली

आहे. मतदानासाठी लागणारे साहित्य ठेवलेल्या स्ट्रॉग रूमभोवती कडक सुरक्षा तैनात आहे. स्ट्रॉग रूममध्ये सीसीटीव्ही देखरेख, पोलीस बंदोबस्त आणि प्रवेशावर काटेकोर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण तयारी प्रक्रियेत ४० ते ५० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. उद्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर डडरंगीत तालीम  देखील आयोजित करण्यात आली असून मतदानाच्या दिवशी कोणताही तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक अडथळा येऊ नये यासाठी सर्व पथके सज्ज