कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे
कारंजा लाड येथे राज्याचा महसूलमंत्री या नात्याने जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबर २०२४ च्या पूर्वी ज्यांनी जिथे घर बांधले असतील त्या घरांना प्रॉपर्टी कार्ड देऊन कायद्याच्या कक्षेत आणणार अशी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या कारंजा नगरपरिषदेच्या निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ३० नोव्हेंबर रोजी स्थानिक अग्रवाल दालमिलच्या परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी खासदार अनूप थोत्रे, आ. सईताई डहाके, विधानपरिषदेचे आ. बाबुसिंग महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत सुनील महाराज, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, निवडणूक प्रभारी राजू पाटील राजे, माजी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ. राजीव काळे, माजी नगराध्यक्ष निशाताई गोलेच्छा भाजपा मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष कविताताई खराट, डॉ. जयश्री गुट्टे, बाळूकाका राठोड, विजय पाटील
काळेयांच्यासह भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते. पुढे बोलताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी विविध विकासात्मक घोषणा केल्या. येत्या काळात केंद्र सरकारच्या ५५, राज्याच्या ४८ तर जिल्ह्याच्या २२ अशा योजना कारंजात राबवायच्या आहेत. कारंजाच्या विकसित विकासाचा आराखडा तयार करायचा असून, जेवढा निधी लागेल तेवढा निधी फडणवीस सरकार देणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषीपंपाला पाच वर्ष मोफत वीज देणे, सूर्यघर योजना, लाडकी बहीण योजनेचे मजबुतीकरण, बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा विकास यावर प्रकाश टाकला. नक्षा योजने अंतर्गत कारंजा शहराचे सर्वेशन करून लँड रेकॉर्ड तयार करण्यात येईल अशीही घोषणा त्यांनी केली. तत्पूर्वी, आ. सईताई डहाके यांनी शासकीय भुखंड वर्ग दोन मधून एक
आणण्याच्या प्रस्तावाकडे महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधले. यावेळी इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ज्येष्ठ पदाधिकारी निरंजन करडे, सूत्रसंचालन माजी नगरसेवक प्रसन्ना पळसकर, आभार जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी मानले. जाहीर सभेला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाषणादरम्यान विज पुरवठा खंडित झाल्याने महसूल मंत्री बावनकुळे यांना सुमारे १० ते १५ मिनिटे माईकवर ताटकळत उभे रहावे लागले. त्यामुळे हा विषय यावेळी चर्चेचा ठरला होता. तसेच भाजप पक्षाची उमेदवारी मिळाली नसल्याने अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ६ वर्षासाठी निलंबित करण्यात येण्याचा प्रस्ताव आपण प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवणार असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले





Social Plugin