Ticker

6/recent/ticker-posts

उमरेड - उमरेड शहरात दुहेरी खून.



किरकोळ वादातून मायलेकीची निर्घुण हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात उमरेड शहरातील गाणंगापूर झोपडपट्टी परिसरात आज २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२:१५ ते १२:४५ वाजताच्या दरम्यान भीषण दुहेरी खुनाची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एकाच मोहोल्यात राहणाऱ्या तरुणाने आई आणि मुलीवर लाकडी दांड्याने हल्ला करून जागेवरच ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत मृत झालेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहे. श्री.पार्वती शंकर फुकट वय ६५ वर्षे तथा श्री.संगीता वसंता रिठे वय ४० वर्षे दोन्ही राहणार गाणंगापुर उमरेड तर आरोपी नितेश किसान ठाकरे वय ३१ वर्षे राहणार गाणंगापूर झोपडपट्टी उमरेड या उमरेड पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी फिर्यादी सौ. सुनीता पंकज जुंबडे वय ३६ वर्षे राहणार मंगळवारी पेठ यांच्या तक्रारीवरून पुन्हा नोंद करण्यात आलाआहे. 

फिर्यादीच्या तोंडीप्रमाणे या  मृतक आई व मोठी बहीण असून या दोघीही व मृतक अशी ह्या एकाच मोहोल्यात राहत असून त्यांच्यात नेहमी तोंडांततोंडी होत असे.आज पुन्हा वाद झाल्यानंतर आरोपीने संतापाच्या भारात लाकडी दांड्याने डोक्यावर जोरदार प्राहार करीत दोघींना जागीच ठार केले.या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक व धनाची झडप आपल्या पथकासह तात्काळ घटनासह दाखल झाले.पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार खूण नालीतील एका दांड्याने करण्यात आलेला असून तो दांडा रक्ताने भरलेला असून दांडा रक्ताने माखलेल्या अवस्थेत घटनास्थळी सापडला आहे.दरम्यान परिसरात बघ्यांची प्रचंड गर्दी उसळली असून नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे.