प्रतिनिधी निरंजन बावस्कर
भोकरदन: शेतकऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण. सरपंच मंगेश साबळे यांच्या आंदोलनामुळे यशस्वी झाले. प्रशासनाने दखल घेत लेखी आश्वासन दिले . शेतकरी पुत्र नारायण लोखंडे व विकास जाधव यांनी उपोषण स्थगित केले.
भोकरदन तालुक्यातील मनरेगा अंतर्गत गाय गोठा, विहीर ,वृक्ष लागवड व वैयक्तिक व सार्वजनिक कामांना तात्काळ मंजुरी द्यावी, मस्टर त्वरित सुरू करावे. व मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावी या मागण्यांसाठी तहसील कार्यालय भोकरदन येथे उपोषणास बसले होते. पाच दिवस उलटून ही प्रशासन दाखल घेत नसल्याकारणाने संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे सरपंच मंगेश साबळे यांनी उपोषणाला पाठिंबा देत पोतराज वेशभूषा परिधान करून हातामध्ये डफडे घेऊन वाजत गाजत तहसील कार्यालय गाठले. व त्यानंतर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या दालनात जाऊन प्रशासनाला धारेवर धरले. मंगेश साबळे यांचा हा पवित्रा पाहून प्रशासन खडबडून जागी झाली.
यानंतर तहसीलदार यांनी तातडीनेउपोषणकर्त्याच्या मागण्यांची सकारात्मक चर्चा केली व लेखी आश्वासन दिले. प्रशासनाच्या या भूमिकी नंतर मंगेश साबळे यांच्या मध्यस्थीने तहसीलदार व पंचायत समिती अधिकाऱ्याच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी ज्यूस देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
यानंतर प्रशासन कोणती कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.





Social Plugin