प्रतिनिधी: निरंजन बावस्कर
भोकरदन: भोकरदन नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भोकरदनच्या मतदारांनी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांना समसमान नगरसेवक निवडून दिले आहे.
विशेष म्हणजे दोन्ही आघाड्यांची संख्या बरोबर पाहता समसमान आहे यामध्ये काँग्रेसच्या दोन नगरसेवकाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. येत्या आठ दिवसांमध्ये स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्षांची निवड होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.





Social Plugin