Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावात मारहाणीसह दरोडा टाकणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारला अटक .

 


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे]  

पुसेगावात मारहाणीसह दरोडा टाकणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार KM कंपनी ग्रुपचा म्होरक्या करण मदने व त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलीसांनी केली अटक केली असून न्यायालयात हजर केले असता  सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे . 

पुसेगाव पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी .महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या परमपूज्य श्री. सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा  पुसेगाव  येथे दिनांक १४डिसेंबर पासून मोठया उत्साहात सुरु आहे. यात्रा शांततेत सुरु असतानाच KM कंपनी नावाने खटाव भागातील व परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचा अनाधिकृत ग्रुप तयार करुन गुन्हे करणारा सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार करण बचाराम मदने वय २१ वर्षे, रा. भवानी टेक खटाव ता. खटाव जि. सातारा याने दिनांक २२ डिसेंबर रोजी पुसेगाव यात्रेनिमीत्त शासकीय विदयानिकेतन जवळ यात्रा मैदानावर भरवलेल्या श्वान शर्यतीचे ठिकाणी त्याच्या ग्रुप मधील गुन्हेगारांना पुसेगावात बोलावून घेतले. करण मदने व त्याचे साथीदार रामदास शंकर जाधव, योगेश युवराज जाधव, वैभव सतिश जाधव सर्व रा. नवलेवाडी पो . मलवडी ता. माण जि. सातारा तसेच शुभम शशिकांत जाधव रा. सिध्देश्वर कुरोली ता. खटाव जि. सातारा वगैरे इसम ग्रुप तयार करुन पुसेगाव यात्रा मैदानावर श्वानशर्यत ठिकाणी आले होते. दिनांक २२ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजणेचे सुमारास पुसेगाव येथील  शासकीय विदयानिकेतनच्या ग्राऊंडवर मोटारसायकल वरुन  सुरज बाबुराव जाधव व त्यांचा चुलत त्यांचा चुलतभाऊ निखील हणमंत जाधव हे दोघेजण करजांळा रोड वरुन त्यांचे स्पेअर पार्ट चे गॅरेजवर जात असताना करण मदने व त्याच्या साथीदारांनी त्यांची मोटारसायकल सु-याचा व चाकूचा धाक दाखवून अडवली व त्यांना गाडीवरुन खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर करण मदने याने तुमच्या खिशातील पैसे मला काढून दया नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही असे म्हणाला त्यावर  चुलत भाऊ निखील जाधव हा त्यास कसले पैसे दयायचे असे म्हणाला असता आरोपी यांनी फिर्यादी व साक्षीदार निखील जाधव यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी आरोपी रामदास शंकर जाधव याने त्याचे हातातील चाकूने निखील जाधव याचे डोक्यात वार करुन गंभीर दुखापत केली. त्यावेळी सूरज जाधव हे त्यांना प्रतिकार करण्यासाठी गेले असता नमूद गुन्हेगारांनी दोघांनाही खाली पाडून हाताने व लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. त्यावेळी निखील जाधव यांना करण याच्या साथीदारांनी पकडून ठेवले व करण बचाराम मदने याने निखील जाधव याचे पँटचे डावे खिशातील १०,०००/- रुपये रक्कम जबरदस्तीने हिसकावून काढून घेतली व त्याचे तीन साथीदारांनी सूरज जाधव यांना पकडून योगेश युवराज जाधव याने फिर्यादीचे गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून काढून चोरुन नेली असलेबाबत फिर्यादी सूरज जाधव यांनी दिले तक्रारीनुसार पुसेगाव पोलीस स्टेशनला गंभीर मारहाणीसह दरोडा टाकलेबाबत गुन्हा नोंद झालेला होता.

या गुन्हयातील चाकूने वार करणारा आरोपी रामदास जाधव यास पुसेगाव पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने जागीच पकडून अटक केली होती. परंतू करण मदने व त्याचे इतर ४ ते ५ साथीदार गुन्हा करुन फरार झालेले होते. पुसेगाव पोलीसांकडून फरार आरोपींचा कसोशीने शोध सुरु असतानाच करण मदने या गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम अशा प्रकारचा गुन्हा करुन फरार असलेने पुसेगाव व परिसरातील नागरिकांनी त्यास अटक करणेबाबत पुसेगाव पोलीसांना निवेदन दिलेले होते. सदर फरारी आरोपी करण मदने याचा श्री. संदीप पोमण व त्यांचे सहका-यांनी सातारा, सोलापूर जिल्हयात कसून शोध घेतलेला होता परंतू सदर गुन्हेगार हा सराईत गुन्हेगार असलेने तो मिळून येत नव्हता. पुसेगाव पोलीसांनी तपास कौशल्याचा वापर करुन व मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन करण मदने यास कराड, मसूर परिसरातून ताब्यात घेतले व त्याच्या साथीदारांना सिध्देश्वर कुरोली भागातून ताब्यात घेऊन गुन्हयामध्ये अटक करुन त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. करण मदने व त्याच्या साथीदारांना मा. न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.

करण बचाराम मदने याने KM कंपनी नावाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचा अनाधिकृत ग्रुप तयार करुन खटाव व माण तालुक्यातील युवकांचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जाळे तयार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नास पुसेगाव पोलीसांनी मोडीत काढले असून अशा प्रकारच्या सराईत गुन्हेगारांना पोलीसांकडून कधीही पाठबळ दिले जाणार नसून वेळीच त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करणार असून पुसेगाव पोलीस ठाणे हददीतील नागरिकांनी भयमुक्त वातावरणात समाजात वावरुन अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचून काढणेकामी पोलीसांना पाठबळ दयावे व सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन श्री. संदीप पोमण सहाय्यक पोलीस निरीक्षक पुसेगाव पोलीस ठाणे यांनी पुसेगाव पोलीस ठाणे हददीतील नागरिकांना केले आहे.

श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती राजश्री तेरणी उपविभागिय पोलीस अधिकारी, कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप पोमण, सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले, दीपक बर्गे, पोलीस हवालदार योगेश बागल, पोलीस काँस्टेबल संतोष बागल, द-याबा नरळे, अविनाश घाडगे, राहूल जाधव, उमेश देशमुख यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक व श्रीमती डॉ. वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.