Ticker

6/recent/ticker-posts

चिमुकल्यांचा बाल बाजारास उत्तुंग प्रतिसाद.



 बुध  दि . (प्रकाश राजेघाटगे- 

रयत शिक्षण संस्थेचे ,हनुमान विद्यालय,निढळ यांच्यावतीने बाल बाजार व स्वाधीन यात्रेचे आयोजन करण्यात आले. 

     निढळ गावचे उद्योजक सचिन क्लॉथ सेंटर मालक श्री. बाळासाहेब सत्रे यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पालक वृंद, विद्यार्थी व निढळ गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाल बाजारासाठी बालगोपाळांनी भेळ, पाणीपुरी,ढोकळा,आप्पे   मेदूवडे,मंचुरियन, तसेच फळे व भाजीपाला, बॉबी, कुरकुरे, बिस्कीट, आईस्क्रीम व जिलेबी इत्यादी खाद्यपदार्थांचे तसेच विविध वस्तूंचे स्टॉल लावले होते. याला निढळकरांनीही चांगलाच प्रतिसाद दिला.                                                  विद्यार्थ्यांना व्यवहाराची जाण व्हावी तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.

   M.S.A.T.(10-A) यांच्यामार्फतही वर्षातून दोन उत्सव साजरे केले जातात, त्यापैकी एक म्हणजेच 'स्वाधीन यात्रा'.या यात्रेनिमित्त विद्यार्थ्यांनी व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विविध उपकरणासह गावातून फेरी काढण्यात आली, त्यानंतर मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरूवून वस्तूंची विक्री केली गेली .या दोन्ही कार्यक्रमात साधारणतः 50,000 रुपयांची उलाढाल झाली. हा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.