(भाग्यश्री धकाते @ उमरेड ग्रामीण प्रतिनिधी )
नागपूरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झालंय.. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. कापसी-महालगाव भागात बिबट्या फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिल्याची माहिती समोर आलीय.त्यानंतर वनविभागाने तातडीने गस्त वाढवून शोधमोहीम सुरू केलीय. पारडी परिसरातील पॉवर स्टेशनकडेही पथकांनी तपासणी केलीय. मात्र अद्याप बिबट्याचे ठोस पुरावे किंवा ठसे वनविभागाला मिळालेले नाहीत. तरीही परिसरात सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले असून वनविभागाने अधिकारी आणि पथक सतत हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत.





Social Plugin