Ticker

6/recent/ticker-posts

मतदान खरेदी - विक्रीचा व्यापार थांबविणे हीच डॉ .बाबासाहेबांना खरी आदरांजली - प्रा.वसंतराव गाडेकर



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी

मंगरूळ नवघरे - स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 6 डिसेंबर या महापरिनिर्वाणदिनी परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून  अभिवादन करण्यात आले.

        यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंतराव गाडेकर यांनी घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना विद्यार्थ्यांनी डॉ .बाबासाहेबांचे मौलीक विचार आत्मसात करावे आणि भारतीय संविधानाचा जीवनभर आदर बाळगून आपल्याला मिळालेल्या घटनादत्त मतदानरूपी अधिकाराचा सद्सद्विवेक बुद्धीने वापर करून देशाचा  सुजान नागरीक बनावे आणि निवडणूकीमध्ये चाललेला मतदान खरेदी - विक्रीचा व्यापार थांबविण्यासाठी नागरीकांनी पुढे होऊन लोकशाहीचे संरक्षण करावे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन केलेयाप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ  शिक्षक डी . एस . वायाळ , अविनाश घुगे, गजानन गोसावी यांचेसह शाळेतील विद्यार्थ्यांनी आदरांजली गीत गायन व मनोगत व्यक्त करून बाबासाहेबांना अभिवादन केले.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन वर्ग १० मधील विद्यार्थिनी कु . शुभांगी जाधव , कु .भारती आंभोरे यांनी तर आभार प्रदर्शन कु . मयुरी अंभोरे हिने केले.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमधून कु .श्रुती जाधव, कु .अस्मिता अंभोरे , प्रियल जाधव , केतन जाधव , कु .श्रावणी पवार, प्रसेनजित जाधव , कु . श्रेया जाधव , कु . श्रद्धा थेटे, हर्षदीप लहाने, कु . प्रेरणा आंभोरे , नव्या वाकडे, कु . शितल देवकर , कु .वैष्णवी थोरहस्ते, कु . मयुरी अंभोरे , कु .श्रावणी पानगोळे, कु . आयोध्या मगर , कु . शुभांगी जाधव , कु .वृषाली गायकवाड , कु . वैष्णवी पवार , कु .अपेक्षा कस्तुरे , कु . रोशनी जाधव या विद्यार्थ्यांनी महामानवाच्या जीवन चरित्रावर  समायोचित भाषणे केली .