Ticker

6/recent/ticker-posts

आराधना गुरव निमंत्रितांच्या कविसंमेलना करता निमंत्रीत



बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जि. प . प्राथमिक शाळा रहाटणी ता खटाव येथील उपक्रमशील शिक्षिका सौ आराधना संतोष गुरव यांना निमंत्रितांच्या कविसंमेलनात निमंत्रीत करण्यात आले आहे . 

सौ आराधना गुरव यांनी ज्ञानसाधने बरोबर कथा , काव्य , ललित, बालनाटिका , विविध वृत्तपत्रातून प्रासंगिक लेख लिहीले आहेत . मृदगंध ,वर्तुळ व कधी कधी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले असून सातारा आकाशवाणी व म्हसवड तरंग वाहिनीवरून सौ . गुरव यांचे विविध विषयावरील साहित्य प्रसारित करण्यात आले आहे . महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पुसेगावच्या त्या सक्रिय सदस्या आहेत .

या निवडी बद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सौ .सुनिताराजे पवार , प्रा . अविनाश फडतरे , श्री संजयराव जाधव , श्री नितीन जाधव , झांजरकार प्रा . श्री . दिनेशराव फडतरे , गटशिक्षणाधिकारी मा .सोनाली विभुते , विस्तार अधिकारी श्री अरुण पाटील साहेब , केंद्रप्रमुख श्री मुलाणी साहेब , मुख्याध्यापक श्री उत्तम माने

तसेच शाळा समिती अध्यक्ष श्री देवीदास थोरात व पदाधिकारी , तसेच अन्य मान्यवरांनी अभिनंदन केले .