दुचाकीवरून महिला पडली; ट्रकखाली चिरडून महिला जागिच ठार
सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा :- दुसरबीड–सिंदखेडराजा रस्त्यावर पश्चिमेस नागझरी नाल्याजवळ झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात बैलगाडीचा बुलेट मोटारसायकला धक्का लागल्यानंतर महिला ट्रकच्या चाकाखाली सापडली. या अपघातात महिलेचा लहान मुलगा व दुचाकी चालक दोघेही सुखरूप बचावले.मात्र महिलेचा जागीच मृत्यू ही घटना ७ वाजता घडली सविस्तर वृत्त असे की, राहेरी बु. येथील भारतीय सैन्यात कार्यरत व सध्या सुट्टीवर आलेले प्रमोद सुरेश गवई (वय ३२) हे पत्नी सौ. कोमल गवई (वय २५) व लहान मुलासह एमएच ३० बीके ४९९९ क्रमांकाच्या बुलेट दुचाकीने सासरवाडी लोणार येथे जात होते. दरम्यान समोर चालणाऱ्या अज्ञात बैलगाडीला दुचाकीचा धक्का लागल्याने मोटारसायकल अचानक थांबली. यावेळी पाठीमागे बसलेल्या सौ. कोमल गवई या रस्त्यावर पडल्या.
याच वेळी समोरून जालन्या कडे जाणारा ट्रक (क्रमांक एमएच २१ बीडब्ल्यू ३३४४) महिलेवरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात लहान मुलगा व दुचाकी चालक प्रमोद गवई दोघेही बचावले.
घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेडराजा येथे पाठविण्यात आला आहे. ट्रक चालकाचे नाव अज्ञात असून वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.





Social Plugin