Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत मोहम्मद शेफान शेख जावेद या विद्यार्थ्याने केले यश संपादन शाळा व कुटुंबा कडून कौतुक*



जावेद धन्नू भवानीवाले(मालेगाव प्रतिनिधी)

मेडशी (ता. मालेगाव, जि. ) येथील संस्कार विद्या मंदिर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वर्ग 9 वी चा विद्यार्थी मोहम्मद सैफान शेख जावेद याने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

ही परीक्षा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, वाशिम येथे पार पडली होती. या परीक्षेत मोहम्मद सैफान याने आपल्या बुद्धिमत्ता, अभ्यासाची सातत्यपूर्ण मेहनत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या जोरावर उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.

या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व अथक परिश्रम कारणीभूत ठरले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्यातील गुणवत्ता विकसित केली. विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने तसेच परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मोहम्मद सैफान याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली असून भविष्यात आणखी विद्यार्थी अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करतील, असा विश्वास शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.