Ticker

6/recent/ticker-posts

आईच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्त जपली सामाजिक बांधिलकी.



संतोष फुलारी @ भेंडा प्रतिनिधि

"आईच्या स्मृती प्रित्यर्थ म्हस्के पाटील परिवाराकडून शाळेस अनोखी भेट....."

जेऊर (ता. 17 डिसेंबर) जेऊर येथील  म्हस्के पाटील परिवाराकडून स्व. गं. भा. गोधाबाई मारुतराव पा. म्हस्के यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर हैबती येथील जवळपास 215 विद्यार्थिनींकरिता  रुपये ८१००० व नरेंद्र महाराज विद्यालय जेऊर येथील 40 विद्यार्थिनींकरिता रुपये 40,000 मदत देऊन सामाजिक कार्याचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.सामाजिक व धार्मिक  क्षेत्रात म्हस्के पाटील परिवार सदैव सहभागी होत असतो. या रकमेतून दोन्ही विद्यालयांतील मुलींच्या शैक्षणिक खर्चाकरिता मदत होणार आहे. या मदतीसाठी शाळा व्यवस्थापन समिती जेऊर हैबती व  शिक्षक वृंद यांनी म्हस्के परिवाराचे आभार मानले आहेत. 

म्हस्के पाटील परिवाराने मातोश्रींच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने शाळेतील मुलींसाठी रुपये ८१,०००/- इतकी मोलाची मदत दिली. ही मदत केवळ आर्थिक नसून मुलींच्या शिक्षणाला आणि उज्ज्वल भविष्यास दिलेले अमूल्य योगदान आहे.