जावेद धन्नू भवानीवाले (मालेगाव प्रतिनिधी)
मेडशीः प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका कै. शिला दिलीप कांबळे यांचा अपघाती मृत्यू झाला असता दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पगारदार कर्मचारी असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र येथील परिचारिकाच्या नॉमिनीस रु. ४५ लाखाचा डी डी बँकेच्या वतीने देण्यात आला.
कै. शिला दिलीप कांबळे यांचे पगार जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत होत असल्याने बँकेच्या वतीने अपघात विमा पॉलिसी काढण्यात आली होती. त्यानुसार कै. शिला दिलीप कांबळे यांच्या मृत्युची माहिती मिळताच दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक लिमिटेड अकोला शाखा मेडशी चे शाखाधिकारी श्री जितेंद्र खंडारे यांनी पगारदार अपघात विमा मिळण्यासाठी पाठपुरावा केला व त्यास मुख्य कचेरीचे प्रफुल पाटील यांनी सहकार्य केले असता बँकेच्या वतीने पगारदार अपघात विम्याची रक्कम रुपये ४५ लाख रक्कम मंजूर करण्यात आली. ही विम्याची रक्कम रुपये ४५ लाख अपघातातील मृतक कै. शिला दिलीप कांबळे यांचा मुलगा श्री गोपाल दिलीप कांबळे यांना देण्यात आली. बँकेचे अध्यक्ष श्री संतोषकुमार कोरपे, बँकेच्या मालेगाव तालुक्याचे संचालक श्री दिलीपराव जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनंत वैध यांच्या मार्गदर्शनात सदर विमा रक्कमेचा डी डी बँकेचे उपमुख्याधिकारी श्री कैलास बिसकुंदे, माध्यमिक आश्रम शाळा काळाकामठा चे मुख्याध्यापक श्री धनराज डोंगरदिवे, नागनाथ विद्यालय, मेडशीचे मुख्याध्यापक श्री कैलास बोरचाटे व बँकेचे मार्केटिंग अधिकारी श्री देवानंद सुर्वे यांच्या हस्ते मृतकाच्या नॉमिनीस हस्तांतरित करण्यात आला. सदर कार्यक्रमास जिल्हा बँक मेडशी शाखेचे शाखाधिकारी श्री जितेंद्र खंडारे, बँकेचे मार्केटिंग अधिकारी श्री सुमेध मोहोड, प्रथिमिक आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री रामू कदम, जिल्हा बँक मेडशी शाखेचे रोखपाल संदीप खुळे, लिपीक कु. समीक्षा बोरसे, लिपीक कु. पुजा इंगळे, कर्मचारी श्री संतोष साठे, मेडशी संस्थेचे गट सचिव श्री जगदीश बहादुरे, संतोष तयाडे तसेच कै. शिला दिलीप कांबळे यांच्या वारस जया जुमडे, माया अंभोरे, छाया खंडारे व वैशाली अंभोरे यांची उपस्थिती होती.





Social Plugin