प्रतिनिधी गोपाल चंदनसे
सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी बांधकाम विभागाशी वेळोवेळी पत्र व्यवहार करून आणि निवेदने देऊन सुद्धा कामाची दखल घेतली जात नाही आणि काम चालू केलं तरी थातुर मातुर केलं जात आहे तेव्हा त्याच्या विरोधात आज 24 डिसेंबर रोजी मळसुर फाट्यावर रस्ता रोको आंदोलन केलं आहे सामजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या नेतृत्वात आलेगाव येथे रास्ता रोको आंदोलन रस्ता बांधून देऊ शकत नसाल तर खुर्ची खाली करा.........
राज्य महामार्ग क्रमांक 284 वर एकाच रस्त्यावर केंद्र आणि राज्य शासनाचा वेगवेगळा निधी तरी सुद्धा कागदावर रस्ता बांधकाम दाखवण्यात आला आहे. हा घोटाळा नव्हे तर महा घोटाळा आहे... शासनाचा निधी कागदोपत्री कामे दाखवून खाण्याचे काम सुरू आहे... दोषी अधिकाऱ्यांवर तसेच भ्रष्ट राज्यकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणी सह रस्ता दर्जेदार बांधून द्यावा यासाठी आंदोलन करण्यात आले आहे.
आदिवासी बहुल परिसरात यांचा सर्वाधिक भ्रष्टाचार आहे... सर्व रस्ते पूल बोगस बांधकामे केले आहेत.कोणीही आवाज उठवत नाही कारण पैसे देऊन आवाज उठविणाऱ्याचा आवाज दाबला जातो आहे.रस्ता नव्हेतर आमचा जीव अडवला गेलाय म्हणून रस्ता रोको आंदोलन करत आहे...
आम्ही निवेदन दिले... विनंत्या केल्या...तरी सुद्धा आम्हाला आंदोलन करण्यासाठी हे प्रशासन भाग पाडत आहे. आम्ही सुद्धा कर भरतो, मतदान करतो.... दर्जेदार रस्ता बांधून मागणे आमचा हक्क नाही का ?.असा प्रश्न निलेश कापकर आणि उपस्थितांनी केला आहेसार्वजनिक बांधकाम विभागाचे डोके ठिकाणावर आहे का ?.खड्डेयुक्त रस्त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.नागरिकांना आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत.
शाळकरी मुलांना रोज या खड्डेमुळे प्रवास धोकादायक ठरत आहे. शेतकरी बांधवांना तसेच व्यापारी बांधवांसाठी या बोगस रस्त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो आहे. यामुळे अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागासोबत पत्रव्यवहार करून सुद्धा केवळ आश्वासनाचे पत्र मिळाले आहेत.
प्रत्यक्षात रस्ता बांधकाम ची कार्यवाही अर्धवट करत आहेत.जी रस्त्यांची कामे सुरू आहेत ती सुद्धा बोगस करण्यात येत आहेत.यामुळे आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आहे.निलेश कापकर यांनी रस्ता कामांमध्ये घोटाळा कसा झाला आहे हे मुद्देमांडून स्पष्ट केले आहे.प्रशांत महाराज यांनी भजनाच्या माध्यमातून आपले रस्त्यावर खड्डे नसून हा खड्ड्याचा रस्ता आहे असे संबोधन केले.
रक्षण भाऊ देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून मागणी केली आहे.नितीन ढोणे यांनी आंदोलन वारंवार का करावे लागत आहे, लोकजागृती केल्याशिवाय भ्रष्टाचाराला आडा बसणार नाही असे म्हटले आहे.
नागरिकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राजेश राठोड यांनी कामाची पाहणी करून ठेकेदाराला समज देण्यात येईल असे फोन कॉल द्वारे निलेश कापकर यांच्या सोबत संवाद केला.जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आंदोलकांना रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्याची विनंती फोन द्वारे केली.त्यामुळे सर्वानुमते आंदोलन स्थगित करण्यात आले.आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले आहेत.
प्रमुख उपस्थिती शिवसंग्राम संघटना जिल्हाध्यक्ष प्रदीप परनाटे, शेतकरी राजा ग्रुप अध्यक्ष रविभाऊ सोनोने, चरणगाव येथील व्यावसायिक अतुल वसतकार, नितीन ढोणे, पुरुषोत्तम आवटे, अमोल गिऱ्हे, रक्षण देशमुख, बाबूसिंग चव्हाण, भगवान राठोड, संदीप राठोड, मुजीब भाई, नदीम भाई, मस्तान भाई तसेच मोठ्या संख्येने आलेगाव परिसरातील नागरिक उपस्थित होते...





Social Plugin